पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप
By Admin | Updated: June 17, 2014 00:40 IST2014-06-17T00:33:06+5:302014-06-17T00:40:42+5:30
हिंगोली : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आलेल्या पहिली ते आठवीच्या १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मोफत पुस्तके देण्यात आली.
पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप
हिंगोली : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आलेल्या पहिली ते आठवीच्या १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मोफत पुस्तके देण्यात आली.
जिल्हाभरातील शाळांना १६ जूनपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये जाण्यासाठी चिमुकल्यांची लगबग दिसून आली. पहिलीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी मोठ्या कुतूहलाने शाळेमध्ये येताना दिसले. या शिवाय अन्य विद्यार्थीही पालकांना घेऊन शाळेमध्ये दाखल झाले होते. विविध शाळांमध्ये पालक आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करीत असल्याचेही दिसून आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या स्वागताची चांगली तयारी केली होती.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून पहिल्याच दिवशी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ८६८ व खासगी अनुदानित १६३ शाळांमधील १ लाख ७४ हजार १६ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात आली. त्यामध्ये पहिलीच्या ६६ हजार १२५ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. तसेच दुसरीमधील ६६ हजार ३१५ विद्यार्थ्यांनाही पुस्तके देण्यात आली. तिसरीमधील विद्यार्थ्यांसाठी ८८ हजार ९२८ पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी ८७ हजार २४९ पुस्तके वाटप करण्यात आली. चौथीमधील विद्यार्थ्यांसाठी १ लाख १० हजार २९० पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ८ हजार ६०४ पुस्तके वाटप करण्यात आली. पाचवीमधील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७० हजार १२८ पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ५५ हजार ४० पुस्तके वाटप करण्यात आली. सहावीमधील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ८७ हजार ९२ पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ७४ हजार ९२ पुस्तके वाटप करण्यात आली. सातवीमधील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७६ हजार ३२८ पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ७४ हजार १२८ पुस्तके वाटप करण्यात आली. आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी १ लाख ३१ हजार २४३ पुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख २८ हजार २४३ पुस्तके वाटप करण्यात आली. ९५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी
सोमवारपासून शाळांना सुरूवात झाली असली तरी गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिंगोली शहरातील शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर गर्दी होताना पहावयास मिळाले. सोमवारी देखील गर्दी पहावयास मिळाली. या दुकानांमधून बॅग, वह्या, पेन, कंपास पेटी, जेवणाचा डब्बा आदींची खरेदी केली जात होती. तसेच अन्य दुकानांमध्ये चप्पल, बूट, छत्री, कोट, शाळेचा ड्रेस आदींची खरेदी होत असल्याची पहावयास मिळाली.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ
जिल्हाभरातील शाळांना १६ जूनपासून सुरूवात झालेल्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांची लगबग दिसून आली शाळेत.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून पहिल्याच दिवशी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याची तयारी केली होती शिक्षण विभागाने.
जिल्हा परिषदेच्या ८६८ व खासगी अनुदानित १६३ शाळांमधील १ लाख ७४ हजार १६ पैकी पहिलीच्या ६६ हजार १२५ विद्यार्थ्यांना देण्यात आली मोफत पुस्तके.
तिसरीमधील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता असलेल्या ८८ हजार ९२८ पैकी ८७ हजार २४९ पुस्तके करण्यात आली वाटप.
शाळेच्या पहिल्याच दिवशी ९५ टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली असून, उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले शिक्षण विभागाने.