शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Drought In Marathwada : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत लागणार ४१४ कोटींचा चारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 2:20 PM

पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. 

ठळक मुद्देजून २०१९ पर्यंत ६०० चारा छावण्या असण्याचा अंदाज मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० मेट्रिक टन इतका चारा लागतो.

औरंगाबाद : मराठवाड्यातील पशुधनाला जून २०१९ पर्यंत ६०० छावण्यांतून चारा पुरवठा करावा लागेल. त्यासाठी अंदाजे ४१४ कोटी २७ लाख १६ हजार रुपयांचा खर्च विभागीय प्रशासनाने अपेक्षित धरला आहे. पुढील सात महिन्यांत सुरू करावयाच्या छावण्यांत आणि लागणाऱ्या खर्चासह किती जनावरांना त्याचा लाभ होईल, याची गृहितके मांडणारा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. 

दुष्काळामुळे मराठवाड्यात चाऱ्याची अडचण निर्माण होणार असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. जानेवारीपर्यंत चारा पुरेल अशी स्थिती असली तरी प्रशासनाने आतापासूनच टंचाईचा अंदाज बांधला आहे. जून २०१९ पर्यंत शेतकऱ्यांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठे, तर ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० मेट्रिक टन इतका चारा लागतो.  जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे.उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच चारा सध्या आहे. 

प्रशासनाचा संभाव्य अहवाल असाजानेवारी २०१९ मध्ये ११० छावण्यांतून २६ हजार मोठ्या, तर ५२०० छोट्या जनावरांना चारा लागेल. फेबु्रवारी २०१९ मध्ये १६१ छावण्यांतून ६ लाख २७ मोठे, २ लाख ३१ हजार छोट्या जनावरांना चारा लागेल.मार्च २०१९ मध्ये ३१० छावण्यांतून ७ लाख ११ हजार मोठ्या व २ लाख ४२ हजार छोट्या जनावरांना चारा लागेल. एप्रिलमध्ये ४७४ छावण्यांतून ७ लाख ४४ हजार मोठ्या आणि २ लाख ४८ हजार छोट्या जनावरांना चारा पुरविला जाईल. मे २०१९ मध्ये ६०० चारा छावण्यांतून ७ लाख ६४ हजार मोठ्या, तर २ लाख ५४ हजार लहान. जनावरांना चारा पुरविण्याचे नियोजन करावे लागेल. जून २०१९ मध्ये ५६९ छावण्यांतून ७ लाख १५ हजार मोठ्या, तर २ लाख ४९ हजार छोट्या जनावरांना चारा पुरवावा लागेल. जानेवारी ते जून २०१९ पर्यंत टप्प्याटप्याने छावण्यांचा आकडा वाढण्याचे संकेत प्रशासनाने अहवालात दिले आहेत. मराठवाड्यातील जिल्हानिहाय पशुधन

जिल्हा            पशुधन औरंगाबाद     १० लाख ६७ हजार ४१२जालना            ६ लाख ९९ हजार २४परभणी           ६ लाख २२ हजार २००बीड              १२ लाख २४ हजार ७९८लातूर             ७ लाख ५२ हजार ४२६उस्मानाबाद    ७ लाख ३७ हजार ३४७नांदेड             ११ लाख ४४ हजार ७२५हिंगोली           ४ लाख ५९ हजार ६८० 

एकूण    ६७ लाख ६१२ 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार