शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढली; पाणी, चारा, रोजगाराच्या शोधात नागरी स्थलांतराला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:24 IST

औरंगाबाद, जालना, नांदेड आणि बीड, उस्मानाबादमध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत.

ठळक मुद्दे३ हजार १०० टँकर्सने मराठवाड्यात पाणी पुरवठा चारा छावण्यांमध्ये ४ लाख ८७ हजार ५०६ जनावरे आहेत. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता वाढली असून, पाणी, चारा, रोजगाराच्या शोधात तात्पुरते नागरी स्थलांतर होण्याचा वेग वाढल्याचे चित्र आहे. २५ टक्के लोकसंख्या पिण्याच्या पाण्यामुळे त्रस्त असून, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नागरी स्थलांतराची माहिती मिळावी, यासाठी पत्र दिले आहे. स्थलांतरामागील कारणे काय आहेत, याची विचारणा त्यांनी पत्रातून केली आहे. 

३ हजार १०० टँकर्सने मराठवाड्यातील ५० लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड आणि बीड, उस्मानाबादमध्ये सर्वाधिक टँकर सुरू आहेत. ते याप्रमाणे : औरंगाबादेत १४, जालन्यात १६, बीडमध्ये ५१९, उस्मानाबादमध्ये ८७. चारा छावण्यांमध्ये ४ लाख ८७ हजार ५०६ जनावरे आहेत. मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ पैकी फक्त ४ लाख ८७ हजार ५०६ जनावरे चारा छावणीत आहेत. 

यंदा ४० हजार मजूर घटलेमराठवाड्यात अंदाजे ६० हजार नागरिक रोजगार हमीच्या कामावर असून, त्यांना मजुरीपोटी दिवसाकाठी सुमारे सव्वाकोटी रुपये द्यावे लागणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मजूर संख्येची नोंद आहे. दुष्काळामुळे मजुरांच्या संख्येत वाढ होत असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी ४० हजार मजूर संख्या घटली आहे. बीड, नांदेड जिल्ह्यांत मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतही मजुरांची संख्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त असल्याची नोंद विभागीय उपायुक्तांच्या दप्तरी आहे. नागरी स्थलांतर, पाणीटंचाई, वाड्या, वस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा प्रशासन सध्या घेत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मजुरांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल- मे महिन्यामध्ये विभागात १ लाखांच्या आसपास मजूर मनरेगाच्या कामावर होते. 

स्थलांतराच्या माहितीसाठी पत्र नांदेड जिल्ह्यातील सात गावांतून स्थलांतर होत असल्याच्या माहितीमुळे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, तसेच बीड, जालना, औरंगाबाद प्रशासनालादेखील त्यांनी पत्र दिल्याचे वृत्त आहे. ४औरंगाबाद तालुक्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातून स्थलांतर होत असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे ठोस अशी माहिती नाही. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले, स्थलांतर होत असल्याचा निश्चित आकडा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीfundsनिधी