शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदावरून ओढाताण

By admin | Updated: September 24, 2014 01:04 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समिती सभापतीपदाची स्पर्धा सुरू झाली आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समिती सभापतीपदाची स्पर्धा सुरू झाली आहे. सभापतीपदावरूनही ओढाताण होऊ लागल्यामुळे मनसेचे ते पाच सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. दि. १ आॅक्टोबर रोजी सभापतीपदासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडीची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. मनसेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले गेले आहेत. अडीच वर्षांच्या पहिल्या टर्ममध्येही काँग्रेसकडे अध्यक्षपदासह जलव्यवस्थापन व स्वच्छता आणि समाजकल्याण या दोन विषय समित्या होत्या.राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षासह पशुसंवर्धन व कृषी आणि महिला व बालकल्याण या दोन विषय समित्या होत्या. मनसेला शिक्षण- आरोग्य आणि बांधकाम- अर्थ समितीची सभापतीपदे मिळाली होती. यावेळीही दोन सभापतीपदे मनसेला दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मनसेच्या ८ सदस्यांपैकी पहिल्या टर्ममध्ये बबन कुंडारे व डॉ. सुनील शिंदे यांना सभापतीपदे मिळाली होती, तर दोन सदस्य पक्षापासून कायम फटकून वागले. त्यामुळे उर्वरित चार सदस्यांमध्ये आता सभापतीपद मिळविण्यासाठी स्पर्धा लागली आहे. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्येही स्पर्धा आहेच. त्यामुळे मनसेचे ते पाच सदस्य अजूनही सहलीवरच आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मनसेकडे असलेले शिक्षण व आरोग्य किंवा बांधकाम सभापतीपद काँग्रेसला हवे आहे. त्या पदावर काँग्रेसचे विद्यमान गटनेते विनोद तांबे यांची वर्णी लागू शकते. तांबे यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत पक्षाचे आदेश मानल्यामुळे सभापतीपदाची बक्षिसी त्यांना मिळण्याचे घाटत आहे.