शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

Drought In Marathwada : खरीप हंगाम गेला, रबीचा विचार न केलेलाच बरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:37 IST

दुष्काळवाडा : दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

- रऊफ शेख, गेवराई गुंगी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

खरीप हंगाम पूर्ण गेल्यात जमा असून, रबी हंगामाचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळाच्या वारंवार बसणाऱ्या झळांनी बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूही सुकले आहेत. हे भयावह चित्र आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी गावचे. 

मागच्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. फुलंब्री तालुका मात्र कोरडाच राहिला. गेल्या तीन वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. यंदाचा दुष्काळ, तर त्यापेक्षाही भयंकर आहे. तीन वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून, गावात हाताला काम न राहिल्याने गावातील तरुण आता शहराकडे कामासाठी निघाले आहेत.  

फुलंब्रीपासून २० कि.मी. अंतरावर राजूर रस्त्यावर गेवराई गुंगी हे ३ हजार २०० लोकवस्तीचे गाव वसले आहे. मतदारांची संख्या १ हजार ६००. गाव परिसरातील शेतजमीन ६० टक्के जिरायती व ४० टक्के हंगामी बागायती आहे. येथील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने कापूस, मका, तूर, बाजरी हीच पिके घेतात. गावाला एकही नदी नाही. परिसरात पाणी साठवण करण्यासाठी प्रकल्प नाही. त्यामुळे बागायती शेती करणे शक्य नाही. परिणामी, येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने हंगामाची खात्री देता येत नाही.

खरीप पिके वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. गेवराई गुंगी येथे १ हजार ६०० शेतकऱ्यांनी यंदा जून महिन्यात कापूस, मका, तूर, बाजरीची लागवड केली; पण लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पाऊस पडला नाही. परिणामी, मक्याची वाळलेली झाडे व कपाशीची तुरळक, वाढ न झालेली झाडे सध्या शेतात उभी आहेत. भुईमुगानेही मान टाकली आहे. 

दुबार पेरणीने बळीराजाला कर्जबाजारी केले असून, गावातील दीडशेवर तरुण औरंगाबाद शहरात रोजगारासाठी फिरत आहेत. पुंजाबाई वामन हिवराळे ही महिला शेतकरी म्हणाली, माझ्याकडे सहा एकर शेती असून, त्यातील तीन एकरमध्ये मका पेरला आहे. पावसाअभावी मक्याची वाढ झाली नसून, तो आता वाळत आहे.  खर्चही निघणार नसल्याने मक्याची काढणीसुद्धा करणार नाही. 

९ पाझर तलाव कोरडे परिसरात अनेक वर्षांपूर्वी ९ पाझर तलाव केले गेले आहेत. ते नादुरुस्त आणि गळके आहेत. पावसाचे पाणी आले तरी त्यात साचून राहत नाही. त्यामुळे या तलावांचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. शिवाय गावातील शेतकऱ्यांच्या शेतात ३०० विहिरी आहेत. त्या आजघडीला कोरड्या पडलेल्या आहेत. नजीकच्या करंजिरा व पठाण मळा हे दोन नाले असून, यावर ९ सिमेंट बंधारे आहेत. यंदा पाऊसच नसल्याने त्यात घोटभरही पाणी नाही.  

पावसाळ्यातही टँकर पावसाळा असूनही गेवराई गुंगी येथील लोकांना उन्हाळाच जाणवत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत ३ टँकर सुरू होते. ते आता बंद झाले असून, गावकरी पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणी करीत आहेत.  

पशुधनही संकटातपिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. फुलंब्री तालुक्यात सुमारे एक लाख २० हजार जनावरे आहेत. यंदा खरीप हंगामात पाऊस मुबलक पडला नाही. मक्याचा थोडाफार चारा मिळाला असून, रबी हंगाम येणार नसल्याने चाराटंचाई निर्माण होणार आहे.  

दुबार पेरणीही गेली वाया गेवराई गुंगी परिसरात दुबार पेरण्या झाल्या असून, १६ आॅगस्टनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. - शिरीष घनबहादूर, कृषी अधिकारी, फुलंब्री 

बळीराजा काय म्हणतो? 

- यंदा दुबार पेरणी करूनही पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने मशागतीपासून पेरणीपर्यंत केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत. -नामदेव साबळे  

- माझ्या चार एकरमधील कपाशी व मका पूर्णपणे वळून गेली असून शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच गावात रोजगार हमी योजनेचे काम सुरु करावे. -प्रकाश डकले  

- माझ्याकडे तीन एकर शेती असून यात कपाशी व मकाची लागवड केली होती. पाण्याअभावी ही पिके वाया गेली आहेत. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने येणाऱ्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. -देवीदास म्हस्के 

- बागायती शेती करणेही अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागते. यंदाही पावसाने धोका दिल्याने खरीप पिके वाळली असून कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी कुठेतरी कामावर जावे लागणार आहे. -उत्तम डकले 

- मागील वर्षीचे बोंडअळीचे अनुदान मिळाले नाही. यंदा खरीप पिके वाया गेली. रबी पिके येणार नसल्याने शासनाच्या मदतीची गरज आहे. शिवाय जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी छावण्या उघडाव्या लागतील. -शेख लतीफ 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी