चोरट्याने मारला दागिन्यांवर डल्ला

By Admin | Updated: June 17, 2014 01:07 IST2014-06-17T01:01:41+5:302014-06-17T01:07:20+5:30

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेचे ९० हजार रुपयांचे दागिने व रोख १,२०० रुपये ठेवलेली पर्स चोरट्याने पळविली.

Drawn on the stolen jewelery | चोरट्याने मारला दागिन्यांवर डल्ला

चोरट्याने मारला दागिन्यांवर डल्ला

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकातून पैठणकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेचे ९० हजार रुपयांचे दागिने व रोख १,२०० रुपये ठेवलेली पर्स चोरट्याने पळविली. ही घटना आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली.
यासंदर्भात क्रांतीचौक ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कोटला कॉलनीतील शनी मंदिराजवळील विजया बँकेत लिपिक असलेल्या गायत्री श्रीनिवास चोबे (३१, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) या पैठणला जाण्यासाठी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचल्या. ९.३० वाजेच्या सुमारास पैठणकडे जाणारी गाडी प्लॅटफॉर्मवर लागली. तेव्हा गायत्री चोबे यांनी बसमध्ये चढण्याची लगबग सुरू केली. गर्दीतून वाट काढत त्या बसमध्ये एका सीटवर बसल्या.
मोबाईल काढण्यासाठी त्यांनी काखेत अडकवलेली पिशवी काढली. पिशवीत ठेवलेली पर्स शोधली असता ती पिशवीत नव्हती. बसमध्ये चढण्यापूर्वी ती पर्स पिशवीत होती आणि ती सापडत नसल्यामुळे गायत्री चोबे घाबरून गेल्या. त्यांनी बसखाली उतरून थेट क्रांतीचौक ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास जमादार नाना पठारे करीत आहेत.
पोलीस चौकी कुचकामी
मध्यवर्ती बसस्थानकात असलेली पोलीस चौकी कुचकामी ठरली आहे. अनेकदा चौकीत पोलीस आहेत की नाही, याबाबत प्रवासी संभ्रमात असतात.
काय गेले चोरीला
गायत्री चोबे यांनी गर्दीत बसमध्ये चढणे अवघड होईल, म्हणून काखेत निळ्या रंगाची पिशवी अडकवली. त्या पिशवीत पर्स ठेवली.
पर्समध्ये ५ हजार रुपयांचा मोबाईल
१,२०० रुपयांची रोकड
३० हजार रुपये किमतीचे गंठण
२० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ बांगड्या
१० हजार रुपये किमतीचे कानातील २ टॉप्स
१० हजार रुपये किमतीच्या ३ अंगठ्या
१० हजार रुपये किमतीची चेन
१० हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र, असा ऐवज होता. ती पर्सच चोरट्याने पळवली.

Web Title: Drawn on the stolen jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.