शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

महानगरपालिका निवडणुकीसाठी डिसेंबरमध्ये होणार ड्रॉ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:00 PM

वॉर्डांची संख्या तेवढीच ठेवणार

ठळक मुद्देयावेळी पॅनल पद्धत ३0 प्रभाग १२0 नगरसेवक

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक संपताच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मनपा प्रशासनासाठी ही निवडणूक यंदा तारेवरची कसरत ठरणार आहे. पहिल्यांदाच शहरात पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. ४० हजार मतदारांचा एक प्रभाग राहणार आहे. या एका प्रभागात चार नगरसेवक राहतील. अनुसूचित जाती जमातींचे वॉर्ड बाजूला ठेवून इतर विविध आरक्षणांसाठी डिसेंबरमध्येच ड्रॉ काढण्यात येणार आहे.

शहरात १२४ नगरसेवकांच्या दृष्टीने ३१ प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मनपा प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांची वाट पाहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात आयोग ड्रॉ घेण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. महानगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपणार आहे. २०२० मध्ये महापौरपद आरक्षित राहील का खुले यादृष्टीनेही आतापासूनच राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच यासंबंधीची घोषणाही होणार आहे. पॅनल पद्धतीत सातारा-देवळाईत ४ नगरसेवक असतील. शहरातील बहुतांश वॉर्डांची रचनाही बऱ्यापैकी बदलणार आहे. शहरात १२४ नगरसेवकांच्या दृष्टीने ३१ प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२ लाख २८ हजार आहे. मनपा निवडणुकीसाठी हीच आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मनपा निवडणुकीतील वॉर्डांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. चार महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. 

३0 प्रभाग १२0 नगरसेवकप्रथमच निवडणूक पॅनल पद्धतीने घेतली जाणार असल्यामुळे वॉर्ड राहणार नाहीत. चार वॉर्ड एकत्रित करून एक प्रभाग तयार केला जाणार आहे. एकूण ३१ प्रभाग राहण्याची शक्यता आहे. ३१ प्रभागांनुसार १२४ नगरसेवक निवडून येतील. ३० प्रभाग केल्यास १२० नगरसेवक निवडून येतील. प्रभाग रचनेवरच विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे. यावर सर्वच राजकीय पक्षांचे गणित अवलंबून राहणार आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग