ड्रेनेजलाईन चोकअप; नळाला दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:40 IST2019-01-14T18:40:30+5:302019-01-14T18:40:52+5:30
ब्रिजवाडी येथे मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून चोकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

ड्रेनेजलाईन चोकअप; नळाला दूषित पाणी
औरंगाबाद : ब्रिजवाडी येथे मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून चोकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ड्रेनेजलाईनला खेटून असलेल्या जलवाहिनीत घाण पाणी मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याविषयी मनपाच्या ड्रेनेज विभागाला नागरिकांनी कळविले असता गाडी नाही, कर्मचारी दुसरीकडे काम करीत आहेत, ते आल्यावर पाठवतो, तुम्ही वरिष्ठांना फोन करा, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
पूर्ण लाईन जाम झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन ड्रेनेजलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी संपत मोकळे यांनी केली आहे.