जिल्हा कचेरीवर धडकला शिक्षकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:47 IST2017-06-18T00:44:48+5:302017-06-18T00:47:12+5:30

जालना : जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.

Dracula teachers' front on District Cure | जिल्हा कचेरीवर धडकला शिक्षकांचा मोर्चा

जिल्हा कचेरीवर धडकला शिक्षकांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषद शिक्षक संघटना समन्वय समितीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
तत्पूर्वी घोगरे क्रीडा संकुलात शिक्षकांना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. दुपारी तीन वाजता क्रीडा संकुलातून पोलीस बंदोबस्तात मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर समितीचे शिवाजी उगले, डॉ. रवींद्र काकडे, अब्दुल चाऊस, दीपक दराडे, मुकेश शिंपले, लक्ष्मण नेव्हल, संतोष राजगुरु, हरी भोसले, संजीवनी वाघमारे, सुशील सूर्यवंशी, आर. आर. जोशी, अरविंद खरात, एम. ए. कादरी, एस. एम. पटवर्धन, सुभाष जायभाये, सुभाष चाटे, रघुनाथ वाघमारे, अब्दुल चाऊस, सिद्धार्थ गजभिये आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Dracula teachers' front on District Cure