शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
2
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
3
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
4
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
5
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
6
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
7
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
8
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
9
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
10
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
11
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
12
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
13
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
14
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
15
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
16
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
17
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
18
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
19
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
20
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!

डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:29 IST

प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची परभणी येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मूळ प्राध्यापक पदावरून बदली झाली आहे. धुळे येथील शासकीय रुग्णालयात डॉ. सुक्रे यांची बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, डॉ. सुक्रे यांच्या कडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा ( घाटी) अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम राहणार आहे.

डॉ. सुक्रे हे परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. डिसेंबर २०२३ पासून त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाचा अधिष्ठातापदाचा कार्यभारही स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात घाटी रुग्णालयात विविध सुधारणांची अंमलबजावणी होत आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत त्यांच्या कामकाजावर टीका झाली. खरेदी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यावर, काही अभ्यागत समिती सदस्यांना कंत्राट न दिल्यामुळे हे आरोप केले जात असल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

प्राध्यापक म्हणून बदलीडॉ. सुक्रे यांनी छत्रपती संभाजीनगर येथीलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून, ते येथेच वैद्यकीय अधीक्षक पदापासून अधिष्ठाता पदापर्यंत कार्यरत आहेत. सध्या शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत.

अधिष्ठाता म्हणून कायम राहणारमी परभणीला प्राध्यापक शरीररचनाशास्त्र या पदावर कार्यरत होतो. आता ह्याच प्राध्यापक पदावर मला धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदावर दाखवले आहे. मी अधिष्ठाता म्हणून छत्रपती संभाजीनगर येथेच काम करत राहणार आहे.- शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी