छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी शिवाजी सुक्रे
By संतोष हिरेमठ | Updated: December 20, 2023 17:27 IST2023-12-20T17:27:17+5:302023-12-20T17:27:33+5:30
डॉ. संजय राठोड यांची वर्षभरातच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी शिवाजी सुक्रे
छत्रपती संभाजीनगर:शासकीय रुग्णालय घाटीच्या अधिष्ठातापदी अचानक डॉ. शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. संजय राठोड यांची वर्षभरातच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली. डॉ. सुक्रे यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला आहे. विशेष म्हणजे, डॉ. सुक्रे हे पूर्वी परभणी येथे अधिष्ठाता होते. आता त्यांच्या जागी डॉ. राठोड यांची तेथे बदली करण्यात आली आहे.
डाॅ. संजय राठोड यांची परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली. परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आणि शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. डाॅ. सुक्रे यांनी दुपारी ४ वाजता घाटीत अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विभागप्रमुख, डाॅक्टर्स, कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.