डॉ.बाबासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:39+5:302020-12-17T04:25:39+5:30

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर एमआयटीचे प्राचार्य डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक कुलगुरू डॉ व्ही. ...

Dr. Babasaheb Ambedkar | डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर एमआयटीचे प्राचार्य डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक कुलगुरू डॉ व्ही. आर. शास्त्री यांनी विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य प्रतिनिधी म्हणून केली आहे. यानिमीत्त एमआयटी समूहाचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार केला.

राज्याचे तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून लोणेरे येथे हे विद्यापीठ कार्यरत आहे. विद्यापीठाला २ मार्च २०१६ रोजी विशेष कायदा करून संपूर्ण राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. डॉ. पाटील यांची नेमणूक तीन वर्षांसाठी राहणार आहे. डॉ. पाटील विद्यापीठाचे शैक्षणिक सहयोगी अधिष्ठाता म्हणून योगदान देत आहेत. यानिमीत्त एमआयटी समूहाचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनी डॉ. पाटील यांचा सत्कार केला. या प्रसंगी प्राचार्य डॉ . संतोष भोसले, एमआयटी पॉलिटेक्निक प्राचार्य सुनील देशमुख, उप प्राचार्य डॉ हनुमंत धर्माधिकारी, डॉ सय्यद अजीज यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

ओळ : डॉ निलेश पाटील यांचा सत्कार करताना प्रा मुनीश शर्मा.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar