शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या डीपीआरचे काम रखडले; ५३ कि.मी. रस्ता आहे फक्त ३५ फुटांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:52 PM

औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाला (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद ते पैठण अंतर ५५ कि़ मी.भारतमाला योजनेत समावेश ५०० कोटींच्या आसपास खर्च 

औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाला (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे. बिडकीन परिसरात १९ कि़मी.च्या अंतरात अडथळ्यांवर मात करीत या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी २५० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता. परंतु नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआर करण्याचे ठरले. औरंगाबाद ते पैठण ६० कि़ मी., पैठण ते शेवगाव ३० कि़ मी., २० कि़मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. १४० कि़मी.पर्यंत या मार्गासाठी १ हजार कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे; परंतु आजवर काहीही वेगवाने हालचाली होताना दिसत नाहीत.

काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. काही मालमत्तांची तोडफोड करावी लागेल. १९ कि़मी.पर्यंत ही परिस्थिती आहे. मनपाची जलवाहिनीदेखील याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च २५० कोटींच्या आसपास जाईल, असे एनएचएआयच्या सूत्रांनी सांगितले.

अजून निर्णय झालेला नाही१९ कि .मी.च्या अंतरात आर्थिकदृष्ट्या जो परवडेल तो पर्याय निवडून त्याची माहिती एनएचएआयच्या मुख्यालयाला कळवावी लागणार आहे. उड्डाणपूल, भूसंपादन करणे अथवा जलवाहिनी स्थलांतरणासाठी मनपाशी चर्चा करण्याचा निर्णय होईल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत मे महिन्यात या रस्त्याबाबत बैठक झाली. एनएचआयएच्या सूत्रांनी सांगितले, डीपीआरचे काम थांबविले आहे. डीपीआरमध्ये जलवाहिनी व इतर अडचणी आहेत. भूसंपादन व इतर जलवाहिन्यांसह किती खर्च लागणार हे डीपीआरनंतर समोर येईल. 

भारतमालात समावेश होऊनही उपयोग नाहीकेंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम सुरू झाले. भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती पुढे आल्यानंतर डीपीआरचे काम बंद पडले आहे.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकार