लातूर व बिहारी संस्थेच्या महा ई- सेवा केंद्रातून दुहेरी लूट

By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:09:47+5:302015-08-07T01:14:22+5:30

लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरी सेवेच्या अकरा प्रमाणपत्राच्या सेवेसाठी लातूर जिल्ह्यात ३४० महा ई - सेवा केंद्राची नोंदणी करण्यात आली असून

Double loot from the Maha-e-Seva Kendra of Latur and Bihari organization | लातूर व बिहारी संस्थेच्या महा ई- सेवा केंद्रातून दुहेरी लूट

लातूर व बिहारी संस्थेच्या महा ई- सेवा केंद्रातून दुहेरी लूट


लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरी सेवेच्या अकरा प्रमाणपत्राच्या सेवेसाठी लातूर जिल्ह्यात ३४० महा ई - सेवा केंद्राची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी १६३ केंद्रांना मान्यता मिळाली आहे़ या केंद्र्रावर जिल्हा समन्वयकाचेही म्हणावे तसे नियंत्रण नसल्याने या केंद्राच्या माध्यमातून सेवेच्या नावाखाली नागरिकांची दुहेरी लूट केली जात आहे़
स्थानिक संस्थेचे १६३ व बिहारमधील संस्थेचेही काही केंद्र लातूर जिल्ह्यात आले असून, या दोन्हीही संस्थेच्या माध्यमातून नागरिकांची लूट आहे. कोणती संस्था खरी अन् कोणती संस्था बोगस, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे़ सातबारा, आठ अ चा उतारा , उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी, आधार, नॉनक्रिमिलीयर, अल्पभूधारक, भूमिहीन यासह इतर प्रमाणपत्र व इतर ५१ सेवेचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात २९६ मान्यताप्राप्त केंद्रापैकी १६३ केंद्राच्या माध्यमातून महा- ई- सेवा केंद्राअंतर्गत नागरिकांना सेवा देण्याचे काम सुरू आहे़ या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्वच सेवेसाठी दुपटीने सर्व्हिस चार्ज लादला जात आहे़ यामध्ये स्थानिक संस्थेच्या महा ई- सेवा केंद्रासह बिहारच्या संस्थेचे केंद्रही लातूरसह उदगीर, अहमदपूर, चाकूर या तालुक्यात स्थापन करण्यात आले आहेत़ या केंद्रातून नागरिकांना प्रामाणिक सेवा देण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट केली जात आहे़ परंतू कोणतीही संस्था नागरिकांना प्रामाणिक सेवा दिल्याचा दावा करीत सर्वसामान्यांची लूट करीत आहे़ यामध्ये बिहारच्या संस्थेचे अनधिकृत केंद्र चार तालुक्यात सुरू असल्याचे समोर आले आहे तर स्थानिक संस्थेच्या नावाखाली लातूर जिल्ह्यातील १६३ केंद्राच्या माध्यमातूनही लूट होत असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्हीही संस्थांवर नियंत्रण ठेवून नागरिकांना नाममात्र शुल्कामध्ये सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Double loot from the Maha-e-Seva Kendra of Latur and Bihari organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.