दुपटीने वाढणार निर्यात

By Admin | Updated: December 23, 2015 00:01 IST2015-12-22T23:19:14+5:302015-12-23T00:01:33+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नाही; परंतु तरी मुंबईमार्गे दरवर्षी एक ते दीड हजार टन माल निर्यात केला जातो.

Double-digit export | दुपटीने वाढणार निर्यात

दुपटीने वाढणार निर्यात

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नाही; परंतु तरी मुंबईमार्गे दरवर्षी एक ते दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर यामध्ये दुपटीने किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डीएमआयसी प्रकल्प
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात विदेशी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे येथील उत्पादन, मालही देश-विदेशात निर्यात होण्यासाठी एअर कार्गो सेवा महत्त्वाची ठरेल. विमानतळ प्राधिकरणानेही या प्रकल्पाला समोर ठेवून एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
कच्च्या मालाची आयात
विविध कंपन्या परदेशातून कच्चा माल मागवितात. अशा कच्च्या मालाची आयात करताना मुंबईत कस्टम क्लीअरन्समध्ये वेळ जातो; परंतु चिकलठाणा विमानतळावर एअर कार्गो सेवेबरोबर आता कस्टम क्लीअरन्सही राहणार असल्याने कच्च्या मालाची आयातही अधिकगतीने होईल.
कमी वेळेत माल जाणार
एअर कार्गो सेवेमुळे कमीत कमी वेळेत माल निर्यात होऊ शकणार आहे. शिवाय मालाची सुरक्षितता वाढेल. त्यामुळे त्याचा औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होईल. मुंबई, दिल्ली येथील कनेक्टिंग विमानसेवेद्वारे ६० देशांमध्ये मालाची निर्यात होईल, असे चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष आशिष गर्दे म्हणाले.
विमानतळाचा विकास
आजघडीला असलेल्या औद्योगिक कंपन्यांबरोबर डीएमआयसी प्रकल्पात येणाऱ्या कंपन्यांसाठी एअर कार्गो सेवा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या उत्पनातही भर पडेल. शिवाय विमानतळाचा विकास होण्यास हातभार लागेल, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.

Web Title: Double-digit export

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.