अयोध्यानगरात मंदिरातून दानपेटी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 18:48 IST2018-12-28T18:48:19+5:302018-12-28T18:48:32+5:30
बजाजनगर अयोध्यानगरातील श्रीराम मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

अयोध्यानगरात मंदिरातून दानपेटी पळविली
वाळूज महानगर : वाळूज महानगरात महिनाभरापासून मंदिरातील दानपेट्या चोरीच्या घटना घडत आहेत. बजाजनगर अयोध्यानगरातील श्रीराम मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
महिनाभरापूर्वी चोरट्यांनी तुर्काबाद व लिंबे जळगाव येथील मंदिरातून दानपेटी पळविली होती. आठवडाभरापूर्वी बजाजनगरातील गणपती मंदिरातून मूर्ती चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच अयोध्यानगरातील श्रीराम मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख फौजदार राहुल रोडे यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका शाळेच्या व एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असावेत, असा अंदाज मंदिराच्या विश्वस्तांनी वर्तविला आहे. या प्र्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरट्यांनी आत्तापर्यंत चार दानपेट्या व एक मूर्ती लंपास केल्यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. परिसरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.