शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 17:10 IST

कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पदाधिकारी संवाद बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन केले.

मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात झालेल्या मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शाह यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

अंतर्गत गटबाजीचे वाद मिटवा....पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजीचे भांडण मिटवा. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या विजय तुमचा होईल. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी दिला.

फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल....लोकसभा निवडणुकीत असलेली नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपल्यावर विशेष नाराज होते. दुष्काळ निसर्गाचा असला तरी तो सरकारने दिलेला असतो, अशी नाराजी लोकांमध्ये असते. महिला मतदानावर फोकस करा, कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMahayutiमहायुतीAurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस