शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:44 IST

राज्यातील मंत्री, पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनीदेखील याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.

छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील पक्ष ज्या महापालिकेत स्वतंत्रपणे लढत असतील, तेथे नेत्यांनी महायुतीला फटका बसेल, असे विधान करू नये, असे युतीतील सर्व पक्षांच्या समन्वय बैठकीत ठरले आहे. विकासाच्या मुद्यांविना काहीही बोलायचे नाही, हीच अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे. राज्यातील मंत्री, पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनीदेखील याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. सर्व पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना याबाबत समज दिली आहे, तर पवारांना विनंती आहे की, त्यांनीदेखील युती धर्म पाळावा, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मनपा निवडणुकीत कुणाचे आव्हान आहे, यावर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, काही ठिकाणी भाजप व शिंदेसेना, एमआयएम, राष्ट्रवादी, उद्धवसेना विरोधात आहे. २२ बंडखोर असले तरी ते आमचेच आहेत. मात्र, जनता भाजपसोबतच राहणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या टिकेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत घ्यायला नको होतं, असे विधान केले. मग पवारांना महायुतीत घेताना भाजपने अभ्यास केला नाही काय? या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांनी तसे बोलायला नको होते. महायुतीच्या समन्वय बैठकीत ठरले आहे की, जेथे महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत असेल तेथे नेत्यांनी महायुतीला फटका बसेल, असे विधान करू नये. दादांना विनंती आहे की, मनभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांना समज देण्याची माझी उंची नाही. परंतु समन्वयक म्हणून विनंती आहे. महायुतीतील १३ पक्षांबाबत काहीही बोलू नये.

‘जो जीता वही सिकंदर’ हे महत्त्वाचे.....किचनमध्ये सर्व्हे केला, निष्ठावंतांना डावलले, यावरून भाजप कार्यालयात दोन दिवस राडा झाला. यावर बावनकुळे म्हणाले, सर्व्हे काही अंतिम नसतो. सर्वंकष विचार केला जातो. उमेदवाराच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचा विचार केला. शेवटी ‘जो जीता वही सिंकदर’ या भूूमिकेतून उमेदवारी दिली जाते. एखाद्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. काही जणांनी उमेदवारी मागे घेतली. आम्ही त्यांच्यासोबत राहू. जे विरोधात गेले, तेदेखील आमचेच आहेत.

बिनविरोध निवड म्हणजे प्रगल्भ लोकशाही...बिनविरोध निवडणुका होणे हे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. स्थानिक जनता, पक्ष ज्याच्यासोबत आहे. त्यानुसार प्रक्रिया ही घडली तर सर्वांना आनंदच होतो. महायुतीचा चेहरा पाहून बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. कल्याण - डोंबविलीमध्ये शिंदेसेना - भाजप युतीचे उमेदवारच बिनविरोध आले आहेत. ठाकरे म्हणतात की, बिनविरोध सगळेच निवडून आणा. यावर बावनकुळे म्हणाले, लोकशाहीची ही प्रगल्भता आहे. ठाकरेंना अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी अडीच वर्षांत अभ्यासच केला नाही, म्हणून त्यांची ही अवस्था आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't speak against alliance: Bawankule advises ministers, requests Deputy CM.

Web Summary : Chandrashekhar Bawankule urged ministers to avoid statements harming the alliance during local elections. He requested Deputy CM Ajit Pawar to maintain alliance integrity. Bawankule emphasized unity, stating that internal disputes should not overshadow the coalition's goals, and that the focus must remain on development.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा