गंगापूर उपजिल्हा रुग्णालयास २० बेडची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:27+5:302021-05-18T04:05:27+5:30
पंचगंगा सीड्सच्या वतीने राज्यभर विविध शासकीय कोविड केंद्रांना आतापर्यंत ३५० बेड भेट देण्यात आले आहेत. त्यापैकी २० बेड ...

गंगापूर उपजिल्हा रुग्णालयास २० बेडची भेट
पंचगंगा सीड्सच्या वतीने राज्यभर विविध शासकीय कोविड केंद्रांना आतापर्यंत ३५० बेड भेट देण्यात आले आहेत. त्यापैकी २० बेड गंगापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड केंद्रास देण्यात आले. यावेळी औरंगाबाद खादी ग्रामउद्योग मंडळाचे अध्यक्ष संतोष माने, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, नोडल अधिकारी डॉ. सुदाम लगास, फैसल चाऊस, कॅप्टन प्रशांत माने, विश्वजित चव्हाण, वाल्मीक शिरसाठ, सचिन माने, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, विजय वरकड, राजू मोरे, प्रा. विशाल साबणे, तुकाराम सटाले, सुधीर माने, बदर जहुरी, अहेमद पटेल आदी उपस्थित होते.
फोटो : गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रास भेट देण्यात आलेले बेड.
170521\20210517_130323_1.jpg
गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड केंद्रास भेट देण्यात आलेले बेड.