उमापूरसह परिसरात घरपोच देशी दारू

By Admin | Updated: July 17, 2014 00:58 IST2014-07-17T00:49:01+5:302014-07-17T00:58:41+5:30

राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, उमापूरसह परिसरात अधिकृत देशीदारू विक्रेत्यांकडून हॉटेल, ढाब्यांसह इतर चोरटी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना घरपोच देशी दारूचे बॉक्स विक्री होत आहेत.

Domestic liquor at home in the area along with Umapur | उमापूरसह परिसरात घरपोच देशी दारू

उमापूरसह परिसरात घरपोच देशी दारू

राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन, उमापूरसह परिसरात अधिकृत देशीदारू विक्रेत्यांकडून हॉटेल, ढाब्यांसह इतर चोरटी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना घरपोच देशी दारूचे बॉक्स विक्री होत आहेत. यामुळे सहजासहजी कोठेही देशी दारू मिळत असल्यामुळे तळीरामांच्या संख्येतही वाढ होत आहे.
गेल्या काही दिवसांत उमापूरसह परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. हॉटेल, ढाबे, पानटपरी आदींमधून सर्रास विनापरवाना देशी दारूची विक्री होते. तसेच या भागात अनेक ठिकाणी खुलेआम मटका नावाचा जुगारही खेळला जातो. काही ठिकाणी पत्त्याचे क्लब आहेत. तर कोठे विनापरवाना गावठी दारूही विक्री होत आहे. काही अधिकृत देशी दारू विक्रेते ग्रामीण भागात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांना घरपोच देशीदारूचे बॉक्स विक्री करीत आहेत. यामुळे तरूण मुलेही दारूच्या आहारी जात आहेत. विनापरवाना होणारी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत उमापूर ठाण्याचे फौजदार जंगले म्हणाले, अशा विक्रेत्यांवर कारवाई करू.(वार्ताहर)
तळीरामांचा महिलांना त्रास
जागोजागी विनापरवाना देशी दारू मिळत असल्याने तळीरामांचे फावले जात आहे. अनेकदा तळीराम रस्त्याने झिंगत जाताना अर्वाच्य बोलतात. याचा महिलांना त्रास होत आहे. अशांवर कारवाईची मागणी आहे.
उमापूरसह परिसरातील काही हॉटेल, ढाब्यावर पोहोंच केले जातात देशी दारूचे बॉक्स.
घरपोच दारू मिळत असल्याने विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांमध्येही झाली वाढ.
अवैध दारू विक्रीसह मटका, पत्त्याचे क्लब, गावठी दारू विक्री असे धंदेही बोकाळले.

Web Title: Domestic liquor at home in the area along with Umapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.