मोकाट कुत्र्यांनी तोडले ११ जणांचे लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:40 IST2019-04-13T22:39:50+5:302019-04-13T22:40:05+5:30
वाळूजला मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांत ११ जणांचे लचके तोडल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

मोकाट कुत्र्यांनी तोडले ११ जणांचे लचके
वाळूज महानगर : वाळूजला मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांत ११ जणांचे लचके तोडल्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाळूज गावात अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मोकाट कुत्रे सायकल व दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. या मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी वाळूज-कमळापूर रस्त्यावर गजराबाई फकीरा पवार, हिरालाल मोतीलाल पवार यांना तर गुरुवारी अक्षय जमधडे, अतुल घुनावत, प्रेम सांळुके, वैभव बनकर, रमेश काकडे व दिलीप रामराव गुंजाळ आदींनी चावा घेतला आहे.
गजराबाई पवार व हिरालाल पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर जखमींना वाळूजच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहे. या शिवाय जिकठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जयश्री धसाळ, अंकुश शेळके, वैभव अणदुरे यांनाही ८ एप्रिल रोजी कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वल चव्हाण यांनी सांगितले. याशिवाय गावातील आनखी काही जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. मात्र त्यांची नावे मिळू शकली नाहीत.