संपकरी डॉक्टरांचे वेतन कापणार !
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-13T23:12:55+5:302014-07-14T01:00:15+5:30
बीड : विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते़ मात्र, संपकाळातील वेतनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणी सोडावे लागणार असून वेतन कपातीच्या हालचाली सुरु आहेत़

संपकरी डॉक्टरांचे वेतन कापणार !
बीड : विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते़ मात्र, संपकाळातील वेतनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणी सोडावे लागणार असून वेतन कपातीच्या हालचाली सुरु आहेत़
राज्यभर सुरु असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ५३ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता़ त्यात ६ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश होता़ १ ते ७ जुलैपर्यंत डॉक्टर संपावर गेले होते़ त्यामुळे वैद्यकीय सेवेवर त्याचा थेट परिणाम झाला होता़ गेवराई तालुक्यातील एका तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे प्रकरण देखील चांगलेच गाजले़ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस बजावून रुजू व्हा, अन्यथा सेवासमाप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता़
दरम्यान, वेतनकपातीची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तिकेतही नोंद होणार आहे़
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी सांगितले, वेतनकपातीचे संकेत आहेत़ अद्याप आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र मिळालेले नाही; पण यापूर्वी संपकऱ्यांची वेतनकपात झालेली आहे़ त्यामुळे यावेळीही कारवाईचे संकेत आहेत़ (प्रतिनिधी)