सिग्नलवरच डॉक्टरला मारहाण

By Admin | Updated: September 20, 2016 00:23 IST2016-09-20T00:19:24+5:302016-09-20T00:23:14+5:30

औरंगाबाद : सुसाट दुचाकीस्वारांनी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना मिलिटरी कॅन्टीन ते नगरनाका वाहतूक सिग्नलदरम्यान रविवारी रात्री घडली.

Doctor suffers on signal | सिग्नलवरच डॉक्टरला मारहाण

सिग्नलवरच डॉक्टरला मारहाण

औरंगाबाद : सुसाट दुचाकीस्वारांनी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना मिलिटरी कॅन्टीन ते नगरनाका वाहतूक सिग्नलदरम्यान रविवारी रात्री घडली.
मच्छिंद्र धनसिंग वाणी (२५) आणि करण पांढरे (२७), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद चव्हाण (रा. जालाननगर) आणि डॉ. मधुकर मगरे (रा. पुंडलिकनगर) हे रविवारी रात्री कारने जात असताना नगरनाका सिग्नलजवळ पल्सरस्वार आरोपी हे वेगात त्यांना ओव्हरटेक करू लागले. कारला ओव्हरटेक करीत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. याबाबत डॉक्टरांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ करून डॉ.चव्हाण यांना ठोसा मारला. त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. विशेष म्हणजे वाहतूक सिग्नलवर त्यांनी ही मारहाण केली. यावेळी वाहतूक पोलीस तेथे येताच आरोपी पळून गेले.

Web Title: Doctor suffers on signal