डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर
By Admin | Updated: July 5, 2014 00:38 IST2014-07-05T00:08:43+5:302014-07-05T00:38:05+5:30
लातूर : गरीब कुटुंबातील रूग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहून तडफडू नये म्हणून शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात
डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर
लातूर : गरीब कुटुंबातील रूग्ण पैशाअभावी उपचारापासून वंचित राहून तडफडू नये म्हणून शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येते़ परंतु, मंगळवारपासून जिल्ह्यातील ९२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे़ परिणामी फटका रुग्णांना बसत आहे़ आर्थिक झळ सोसत रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे़ गरीब रुग्णांची मोठी पंचाईतच झाली असल्याने उपचारासाठी तडफड सुरु आहे़ संपामुळे आरोग्य केंद्रातील रूग्णांच्या तपासणीबरोबर शस्त्रक्रियाही थांबल्या आहेत़ डॉक्टरांच्या संपामुळे रूग्ण वाऱ्यावरच असल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा
उपजिल्हा रूग्णालय - २
ग्रामीण रूग्णालय - १०
प्राथमिक आरोग्य केंद्र - ४६
संपात सहभागी झालेले जिल्ह्यातील डॉक्टर
उपजिल्हा रूग्णालय - ४०
ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र - ५२