पथकाची चाहूल लागताच डॉक्टराने ठोकली धूम !

By Admin | Updated: June 2, 2014 00:50 IST2014-06-02T00:17:18+5:302014-06-02T00:50:23+5:30

औसा : औसा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने बोगस डॉक्टरांविरुद्ध शोधमोहीम हाती घेतली आहे. ३१ मे रोजी हे पथक तालुक्यातील दावतपूर येथे दाखल झाले.

Doctor shakes his head with a bang! | पथकाची चाहूल लागताच डॉक्टराने ठोकली धूम !

पथकाची चाहूल लागताच डॉक्टराने ठोकली धूम !

औसा : औसा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने बोगस डॉक्टरांविरुद्ध शोधमोहीम हाती घेतली आहे. ३१ मे रोजी हे पथक तालुक्यातील दावतपूर येथे दाखल झाले. या पथकाची चाहूल लागताच तेथील एका बोगस डॉक्टराने धूम ठोकली असल्याचा प्रकार घडला. परिणामी, पथकावर वाट पाहून परतण्याची वेळ आली आहे. दावतपूर येथे डॉ. अजय विश्वास हे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर. शेख यांना मिळाली. डॉ. हजारे, ए.एन.एम. हांडे, पोलिस कर्मचारी कोतवाड या पथकासह ३१ मे रोजी शनिवारी ते दावतपूर येथे पोहोचले. सदरील आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचल्याचे समजताच डॉ. अजय विश्वास यांनी गावातून धूम ठोकली. पथकाने त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. बोगस डॉक्टर पळून गेल्याचे पाहून पथक फिरत राहिले. त्यानंतर रात्री मात्र या डॉक्टरने आपला बाडबिस्तरा गुंडाळून गाव सोडल्याचे सांगण्यात आले. औसा तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरापासून दूर असलेल्या अनेक गावांमध्ये बंगाली डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली आहेत. अनेक गावांत किरकोळ आजाराचे रुग्ण अशा डॉक्टराकडून उपचार करून घेतात. त्यामुळे या डॉक्टरांची दुकानदारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे समोर आले आहे. बोगस डॉक्टरांविरुद्ध शोधमोहीम सुरू झाली की हे डॉक्टर पसार होतात. आणि ही मोहीम थंडावली की पुन्हा त्यांची दुकानदारी सुरू होते, असे चित्र मागील काही वर्षांपासून औसा तालुक्यात पहायला मिळत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस बोगस डॉक्टरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) शोधमोहिमेला आरोग्य खात्याकडून गती याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर. शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे. औसा तालुक्यातही वरिष्ठांच्या आदेशानुसार बोगस डॉक्टरांविरुद्ध शोधमोहीम सुरू केली आहे. दावतपूर येथे बोगस डॉक्टरावर कारवाई करण्यासाठी पथकासह गेलो. पण पथक आल्याचे समजताच त्या डॉक्टराने धूम ठोकली. त्यामुळे कारवाई करता आली नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Doctor shakes his head with a bang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.