भटकंती करुनही चारा, पाणी अन् रोजगारही मिळेना़़़

By Admin | Updated: August 23, 2015 23:46 IST2015-08-23T23:38:22+5:302015-08-23T23:46:45+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर पावसाअभावी उदगीर तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाकडून मात्र कोणत्याच ठोस उपाययोजना होत नाहीत़ त्यातच चारा,

Do not get fodder, water and employment even after wandering | भटकंती करुनही चारा, पाणी अन् रोजगारही मिळेना़़़

भटकंती करुनही चारा, पाणी अन् रोजगारही मिळेना़़़


व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर
पावसाअभावी उदगीर तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाकडून मात्र कोणत्याच ठोस उपाययोजना होत नाहीत़ त्यातच चारा, पाणी व रोजगारासाठी परिसरात भटकंती करूनही रिकाम्यापावली परतण्याची वेळ शेतकरी, शेतमजूरांवर आली आहे़ त्यामुळे परिसरातील बेरोजगार, शेतमजूर कामाच्या शोधात शहरे गाठत असल्याचे चित्र आहे़
गत अनेक वर्षातील यंदाच्या दुष्काळाने उदगीर तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़ तालुक्यातील नदी नाले कोरडे ठाक पडले आहेत़ तर विहीरी आटून गेल्या आहेत़ बोअर बंद पडत आहेत़ पाण्याची सर्वच स्त्रोतांनी तळ गाठला आहे़ यामुळे मानवाबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतमजूरांच्या हाताला काम नाही़ जनावरांच्या चाऱ्याचाही प़्रश्न गंभीर बनला आहे़ पशुपालक शेतकरी आपले पशुधन सांभाळण्याऐवजी विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत़ एकीकडे निसर्गाने दुष्टचक्र चालविले असताना प्रशासकीय पातळीवरही शेतकरी शेतमजूरांना मदतीचा हात मिळत नाही़ उदगीर तालुक्यात पशुधनाची संख्या ६२ हजाराच्या वर आहे़ तालुक्यात पशुधन सांभाळणे कठीण बनले असताना प्रशासनाकडूनही अद्यापही चारा छावणी उभी केली जात नाही़ जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची कुठलीही ठोस उपाय योजना केली जात नाही़ यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर अजूनही कुठलीच हालचाल झाली नसल्याने याबाबतीत प्रशासन किती गंभीर आहे हेच दिसून येत आहे़ तालुक्यात ४८ हजार मजूरांनी मग्रारोहयोचे काम मिळण्यासाठी नाव नोंदणी केलेली असताना प्रशासनाकडून मात्र फक्त दोनशे मजूरांनाच काम उपलब्ध करून दिले आहे़ त्यामुळे बहूसंख्य मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेत आहेत़ देवर्जन परिसरात मग्रारोहयोची अधिकाधिक कामे सुरू करून या भागातील मजूरांना काम देण्याची मागणी देवर्जनच्या सरपंच शेषाबाई कांबळे यांनी उदगीरच्या तहसीलदाराकडे केली आहे़

Web Title: Do not get fodder, water and employment even after wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.