शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

दोन जागा भरु नका

By admin | Updated: July 20, 2014 00:27 IST

नांदेड : वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन जागा न भरण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महावितरण कंपनीला दिला आहे़

नांदेड : वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन जागा न भरण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महावितरण कंपनीला दिला आहे़महावितरण कंपनीने मार्च २०१४ मध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाच्या १९५७ जागा सरळसेवा भरतीद्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता संबंधित उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते़ त्यासाठी एस़एस़सी़ व वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायातील अथवा सेंटर आॅफ एक्सलंसमधील एनसीटीव्हीटी नवी दिल्लीकडून घेण्यात येणारे प्रमाणपत्र अशी अर्हता नमूद करण्यात आली होती़ १९५७ पैकी २०७ पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील तर ६३ पदे भटक्या जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले होते़ जाहिरातीच्या अनुषंगाने संतोष मुसळे यांनी वंजारी तर सखाराम वाघमारे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणाच्या अनुषंगाने या पदासाठी अर्ज केला होता़ दोघांनीही संबंधित अर्हता ग्रहण केली होती़ २७ एप्रिल रोजी त्यांनी आॅनलाईन परीक्षा दिली़ यात ते उत्तीर्ण झाले़ ५ मे रोजी उत्तीर्णाची यादी जाहीर करण्यात आली़ त्यात या दोघांचाही समावेश होता़ यानंतर त्यांना मूळ कागदपत्रांसोबत नांदेड येथील महावितरणच्या झोनल आॅफिसमध्ये बोलावण्यात आले़८ मे रोजी त्यांनी मूळ प्रमाणपत्र महावितरणकडे सादर केले़ निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली़ त्यामध्येही दोघांचे नाव होते़ त्यामुळे दोन्ही उमेदवार हे नेमणुकीच्या आदेशाची वाट पाहत होते़ असे असताना अचानकपणे दोन्ही उमेदवारांना त्यांच्या मोबाईलवर सिनिअर मॅनेजर झोनल आॅफिस ए़एक़ेदारे यांच्या मोबाईल क्ऱ ७८७५४६९७३१ याद्वारे मॅसेज करून कळविण्यात आले की त्यांची निवड रद्द करण्यात आली़ याबाबतचे कारण नमूद नव्हते़ (प्रतिनिधी)नांदेड झोनमध्ये आहेत ९० जागादोन्ही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड़अमित मुखेडकर यांच्यामार्फत रिटयाचिका दाखल करून आव्हान दिले़ न्यायमूर्ती एस़व्हीग़ंगापूरवाला व ए़एम़बदर यांच्या संयुक्त पिठापुढे ही याचिका सुनावणीला आली़ यावर न्यायालयाने अंतरिम आदेशान्वये भटक्या जमाती संवर्गातून एक जागा व अनुसूचित जाती संवर्गातील एक जागा रिक्त ठेवण्याबाबत महावितरणला आदेशित केले़ २३ जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे़ या भरतीमध्ये नांदेड झोनमधील ९० जागा आहेत़ ज्यात ४५ जागा नेमणुकीचे आदेश वीजवितरण कंपनीने दिले़ ४५ जागा रिक्त आहेत़