६० खाटांच्या स्त्री, बाल रुग्णालयाला भार सोसवेना !
By Admin | Updated: January 14, 2015 00:55 IST2015-01-14T00:32:20+5:302015-01-14T00:55:55+5:30
गजानन वानखडे , जालना येथील शासकीय स्त्री व बाल रूग्णालयाची क्षमता ६० खाटांची असताना भार मात्र १०० खाटांचा पडत आहे. कर्मचारी तेवढेच, रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याने रुग्णांची गैरसोय होत

६० खाटांच्या स्त्री, बाल रुग्णालयाला भार सोसवेना !
गजानन वानखडे , जालना
येथील शासकीय स्त्री व बाल रूग्णालयाची क्षमता ६० खाटांची असताना भार मात्र १०० खाटांचा पडत आहे. कर्मचारी तेवढेच, रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहेच. सोबत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही त्याचा ताण पडत आहे.
जिल्हातील आठही तालुक्यातील सर्वसामान्यांसाठी हे परवडण्यासारखे रुग्णालय असल्याने रुग्णांची संख्या वाढते. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. सोनोग्राफी मशीन दोन वर्षापासून बंद असल्याने तपासणीसाठी हे रूग्ण शासकीय रुग्णालयाकडे जातात. तिथेही एकच सोनोग्राफी मशीन असल्याने स्त्री रुग्णालयाच्या पेशेंटना दहा-बारा दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.
डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार गरोदर महिलेने चार महिन्यानंतर बालकात काही व्यंग आहे का हे आणि प्रसुतीला काही दिवस शिल्लक असताना सोनोग्राफी करणे पुरेसे असते. पंरतु रूग्णांचे नातेवाईक अनेकवेळा आवश्यकता नसतांना देखील सोनोग्राफीची चिठ्ठी लिहून देण्याची मागणी वारंवार करतात. त्यामुळे मशीनवर ताण वाढतो. शिवाय या महिला व बाल रुग्णालयात रेडियोलॉजीस्टचे पदही नाही. त्यामुळे देखील मशीनमध्ये वारंवार बिघाड होतो, अशी माहिती रुग्णालयाचे अधिक्षक एस.आर पाटील यांनी दिली.