डीएमआयसी भूसंपादन; ३२५ कोटी उपलब्ध
By Admin | Updated: June 7, 2014 00:51 IST2014-06-07T00:47:02+5:302014-06-07T00:51:47+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी संपादित बिडकीन परिसरातील जमिनीचा मोबदला देण्यासाठी उद्योग खात्याने आज ३२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

डीएमआयसी भूसंपादन; ३२५ कोटी उपलब्ध
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी संपादित बिडकीन परिसरातील जमिनीचा मोबदला देण्यासाठी उद्योग खात्याने आज ३२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या पैशांचे शेतकऱ्यांना लवकरच वाटप केले जाणार असल्याचे भूसंपादन अधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले.
डीएमआयसी प्रकल्पासाठी बिडकीन, निलजगाव, नांदलगाव, बन्नी तांडा आणि बंगला तांडा या पाच गावांच्या परिसरातील २३५१ हेक्टर जमीन संपादित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सरकारने या जमिनीला एकरी २३ लाख रुपयांचा भाव दिला आहे. या जमिनीचा एकूण मोबदला १३१४ कोटी रुपये एवढा आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांत ४७५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. आज आणखी ३२५ कोटी रुपये उद्योग खात्याकडून भूसंपादन अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले.