डीजे न्यूक्लियाच्या संगीतावर थिरकली तरुणाई

By Admin | Updated: April 26, 2015 01:00 IST2015-04-26T00:43:08+5:302015-04-26T01:00:23+5:30

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डीजे न्यूक्लियाने शहरातील तरुणाईला पाश्चिमात्य आणि भारतीय मिश्र संगीताच्या तालावर थिरकायला लावले.

DJ Nuklia's music spins | डीजे न्यूक्लियाच्या संगीतावर थिरकली तरुणाई

डीजे न्यूक्लियाच्या संगीतावर थिरकली तरुणाई


औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डीजे न्यूक्लियाने शहरातील तरुणाईला पाश्चिमात्य आणि भारतीय मिश्र संगीताच्या तालावर थिरकायला लावले. क्रांतीचौक येथील हॉटेल मेनॉरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ‘डीजे नाईट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) क्षेत्रामध्ये ‘डबस्टेप’ संगीताच्या माध्यमातून न्यूक्लिया नावाने जगभरात प्रसिद्ध झालेल्या उदयन सागरचा औरंगाबादेतील हा पहिलाच कार्यक्रम होता. ‘लोकमत टाईम्स’ आणि ‘फ्रंट इंटरटेनमेंट’ प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतातही मागील एक दशकापासून ‘इडीएम’ची क्रेझ जोर पकडत आहे. यामध्ये फक्त मिश्र संगीत असून त्यात गाण्याचे बोल नसतात. ‘लाऊड म्युझिक’चा हा प्रकार असून तो ‘डबस्टेप’ पद्धतीतून सादर केला जातो.
ज्याद्वारे आपोआप आपले पाय ठेका धरायला लागतात. डीजे न्यूक्लियाच्या संगीतावर थिरकणारे हजारो तरुण औरंगाबादमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाहायला मिळाले. खाद्यपदार्थांची चव घेत घेत हजारो तरुण-तरुणी ‘डबस्टेप’ संगीतावर थिरकल्या. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी आता पुणे-मुंबईला जाण्याची गरज राहिली नाही.
औरंगाबाद शहर झपाट्याने वाढत असताना शहराची संस्कृतीही आधुनिक होत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे येथे आयोजित केले जावेत, असे मत अनेक तरुणांनी व्यक्त केले.

Web Title: DJ Nuklia's music spins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.