घटस्फोटित महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:03 IST2021-02-14T04:03:56+5:302021-02-14T04:03:56+5:30

सोनाली रमेश खराडे (२४, रा. दादा कॉलनी) असे मयत महिलेचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ...

Divorced woman commits suicide | घटस्फोटित महिलेची आत्महत्या

घटस्फोटित महिलेची आत्महत्या

सोनाली रमेश खराडे (२४, रा. दादा कॉलनी) असे मयत महिलेचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतल्यापासून सोनाली या आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तिचे वडील कामावरून घरी परतले तेव्हा सोनालीची खोली आतून बंद असल्याचे पाहून त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. नागरिकांनी दार तोडून पाहिले असता सोनालीने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाइकांनी तिला लगेच बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

===================

मसनतपूर येथे तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद : अशोकनगर, मसनतपूर येथील रहिवासी मनोज अशोक जगधने (२८) या तरुणाने शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती. मनोजच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याविषयी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Divorced woman commits suicide