अवघ्या १३ दिवसांत घटस्फोट अर्ज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:11+5:302020-12-29T04:05:11+5:30
विशेष म्हणजे, अर्जदारांचे लग्न झाल्यानंतर सहाव्याच दिवसापासून दोघे विभक्त राहत होते. त्यांनी २ डिसेंबर २०२० रोजी दाखल ...

अवघ्या १३ दिवसांत घटस्फोट अर्ज मंजूर
विशेष म्हणजे, अर्जदारांचे लग्न झाल्यानंतर सहाव्याच दिवसापासून दोघे विभक्त राहत होते. त्यांनी २ डिसेंबर २०२० रोजी दाखल केलेला घटस्फोट अर्ज न्यायाधीश आशिष अयाचित यांनी १४ डिसेंबर २०२० रोजी मंजूर केला.
अर्जदारांचा विवाह ४ जानेवारी २०१६ ला ख्रिस्ती विवाह पद्धतीने झाला होता. परस्पर पटले नसल्यामुळे दोघे १० जानेवारी २०१६ पासून विभक्त राहत आहेत. दोघांनी संमतीने घटस्फोट अर्ज दाखल केला होता. दोघांच्या विनंतीवरून न्यायालयाने ६ महिन्यांचा कालावधी माफ केला होता. विवाह समुपदेशकांनी तडजोड शक्य नसल्याचा अहवाल दिला.
दोघांनी संमतीने विवाह विच्छेदनाचा निर्णय घेतला असून त्यांचा वाद मिटून विवाह पुनर्स्थापित होऊ शकत नसल्याची खात्री झाल्यामुळे घटस्फोट अर्ज मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
अर्जदारातर्फे ॲड. प्रदीप एन. शिंदे पाटील आणि ॲड. सुप्रिया कणगरे यांनी काम पाहिले.