जिल्ह्यातील खाणपट्टे पथकाच्या रडारवर !
By Admin | Updated: May 25, 2014 01:07 IST2014-05-25T00:49:04+5:302014-05-25T01:07:28+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील खाणपट्टयांच्या मोजणी व तपासणीसाठी जिल्ह्यात बुधवारी पथक येणार असून या पथकामार्फत जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्यांची मोजणी करण्यात येणार आहे

जिल्ह्यातील खाणपट्टे पथकाच्या रडारवर !
उस्मानाबाद : जिल्ह्यातील खाणपट्टयांच्या मोजणी व तपासणीसाठी जिल्ह्यात बुधवारी पथक येणार असून या पथकामार्फत जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्यांची मोजणी करण्यात येणार आहे. यात काही गैरप्रकार आढळून आल्यास संबधितावर कार्यवाही व दंड ठोकणार येणार आहे. याबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाणपट्टे आहेत. ठरवून दिलेल्या निष्कर्षापेक्षा जास्त उत्खनन झाले आहे का? याचा शोध या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या जागेमध्ये उत्खनन केले की दुसर्याच ठिकाणी केले? अशा विविध बाबीचा आढावा हे पथक घेणार आहे. तपासणीदरम्यान कोणी नियंमाचे उल्लंघन केले असल्यास संबधितावर दंड लावण्यात येणार असून, प्रसंगी खनिजपट्टा रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या पथकामार्फत उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, भूम व परंडा येथील खाणपट्ट्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिली. खनिपट्टा मोजणीच्या कामी जागेच्या मोक्यावर तलाठी, मंडळ अधिकारी व खाणपट्टाधारकांना आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील खनिजपट्ट्यांची २८, २९ व ३० मे रोजी, तुळजापूर ३१ मे व १ जून, लोहारा २ जून, उमरगा ३ व ४ जून, कळंब ५ जून, वाशी व भूम ६ जून तर परंडा तालुक्यातील खनिज पट्ट्यांची ७ जून रोजी तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद, येडशी, वाघोली, उपळा, पाडोळी, वडगाव, जहागिरदारवाडी, शिंगोली, सकनेवाडी, कुमाळवाडी, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर, सिंदफळ, सावरगाव, तामलवाडी, वडगाव लाख, पिंपळा बुद्रुक, काक्रंबा, खंडाळा, रायखेल, अरबळी, टेलरनगर, नळदुर्ग, मोर्डा, बोरी, लोहारा तालुक्यातील जेवळी (रुद्रवाडी), खेड, लोहारा खुर्द, उमरगा तालुक्यातील उमरगा, कोरेगाववाडी, गुगळगाव, काळानिंबाळा, गुंजोटी, गुरुवाडी, कळंब तालुक्यातील वडगाव शि), हासेगाव (के), डिकसळ, उपळाई, रांजणी, वाशी तालुक्यातील मस्सा, पार्डी, इसरुप, भूम तालुक्यातील पाडोळी, हांडोग्री, परंडा तालुक्यातील परंडा, जामगाव, आवारपिंपरी, काटेवाडी, रोसा, कुंभेजा, अनाळा येथील खदानीची मोजणी व तपासणी संबधित पथकामार्फत करण्यात येणार आहे.