जिल्ह्याचा ८०़८९ टक्के निकाल
By Admin | Updated: June 13, 2017 23:39 IST2017-06-13T23:38:49+5:302017-06-13T23:39:38+5:30
परभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

जिल्ह्याचा ८०़८९ टक्के निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २९ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २९ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार ८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची जिल्ह्याची टक्केवारी ८०.८९ टक्के एवढी आहे. इतर जिल्ह्यांचा निकाल पहाता परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात शेवटच्या स्थानावर राहिला आहे. विशेष म्हणजे,गतवर्षीही जिल्हा शेवटच्याच स्थानावर होता. यावर्षी परभणी जिल्ह्यातील ४ हजार ५८२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ८ हजार ५२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ८ हजार ४०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आणि २ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तालुकानिहाय निकालामध्ये जिंतूर तालुक्याने बाजी मारली आहे. जिंतूर तालुक्याचा निकाल ८६.३८ टक्के लागला असून गंगाखेड तालुक्याचा ८३.१० टक्के, परभणी तालुक्याचा ८१.१० टक्के, सेलू तालुक्याचा ८०.७४ टक्के, पाथरी तालुक्याचा ७९.५० टक्के, पूर्णा तालुक्याचा ७९.३६ टक्के, पालम तालुक्याचा ७९.२६ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ७५.८४ टक्के आणि मानवत तालुक्याचा निकाल ७०.२५ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालामध्ये यावर्षी समाधानकारक वाढ झाली आहे़ मागील वर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल ७७़८० टक्के निकाल लागला होता़ यावर्षी १० टक्क्यांनी निकाल वाढला आहे़ दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला़ त्यानंतर परभणी शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती़ परभणी जिल्ह्यात १५ जून पासून शाळा सुरू होणार आहेत़ सध्या शाळांना सुट्या असून, यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला़