शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसामुळे जिल्हा टँकरमुक्त

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. गावोगावी नेहमीच्या जलस्रोतांना पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे टँकर बंद केले आहेत. परिणामी आठ महिन्यांपासून टँकरवर तहान भागविणारा जिल्हा मंगळवारी टँकरमुक्त झाला. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला होता. मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या १८२ झाली होती. जून महिन्यात पावसामुळे टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती; परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेला, त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढली. जूनअखेरीस टँकरची संख्या ३०७ वर पोहोचली. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढून ३२७ झाली; मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस बरसत राहिल्यामुळे उन्हाळ्यात आटलेले अनेक स्रोत जिवंत झाले. ठिकठिकाणच्या विहिरी आणि कूपनलिकांना पाणी आले. त्यामुळे बहुसंख्य गावांचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला. परिणामी प्रशासनाने अनेक ठिकाणचे टँकर बंद केले.जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी २९७ टँकर सुरू होते. चार दिवसांपूर्वी यातील २७१ टँकर बंद करण्यात आले. पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड हे तालुके टँकरमुक्त झाले. केवळ औरंगाबाद आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच २६ टँकरने काही गावांना पाणीपुरवठा केला जात होता; पण आज मंगळवारी हे टँकरही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.