शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

लाचेत अडकलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची ७ वर्षांपासून कारकीर्द वादग्रस्तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:13 IST

कविता नावंदे राहत असलेल्या अलिशान सोसायटीत घोटाळेबाज हर्षकुमारनेही घेतला होता फ्लॅट

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धेचे देयक काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या. परभणी एसीबीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांपासून नावंदे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून यापूर्वी त्यांना एकदा निलंबित करण्यात आले होते.

मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्वीमिंग पूलची मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते. गुरुवारी दुपारी एसीबीने त्यांना उर्वरित रक्कम स्वीकारताना अटक केली. त्यानंतर क्रीडा विभागात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, डिसेंबरमध्ये शहरात विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडने विमानतळासमोरील अलिशान सोसायटीत दीड कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता. त्याच्या समोरील इमारतीतच नावंदे यांचा फ्लॅट आहे. परभणीत त्यांना अटक होताच एसीबीच्या दुसऱ्या पथकाने त्यांच्या या फ्लॅटमध्ये धाड टाकून संपत्तीची मोजदाद सुरू केली होती.

वादग्रस्त कारवाईची पार्श्वभूमी-नावंदे २०२०-२०२१ मध्ये शहरातील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी होत्या. व्यायामशाळा साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान वाटप अनियमिततेप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते.-चार वर्षांपूर्वी एका सेवानिवृत्त क्रीडा अधिकाऱ्याला विनामोबदला सेवेत सामावून घेतल्याप्रकरणी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी त्यांना नोटीस बजावली होती.-२०१९ मध्ये अहिल्यानगरमध्ये असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.-जून, २०२० मध्ये अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात विनापरवाना प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर बेलवंडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी