शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षांनाच लेखणीबंदचा विसर !

By admin | Updated: April 20, 2016 23:45 IST

बीड : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलादरम्यान रोहयोच्या मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याने ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे गोत्यात आले आहेत

बीड : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलादरम्यान रोहयोच्या मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याने ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे गोत्यात आले आहेत. त्यांना स्वत:लाच लेखणीबंद आंदोलनाचा विसर कसा पडला? याचीच खमंग चर्चा बुधवारी ग्रामसेवकांत रंगली होती.‘लेखणीबंदमध्येही दाखवले मजूर’ या मथळयाखाली ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताने नारायण बडे यांनी रोहयो कामांत चऱ्हाटा गावात केलेल्या ‘कर्तव्य’पूर्तीचा नमुना चव्हाट्यावर आला. ग्रामरोजगार सेवकाचा विरोध झुगारुन त्यांनी कामावर मजूर नसतानाही ते मस्टरवरील हजेरीपटावर दाखवले. विशेष म्हणजे ६१ मजुरांच्या नावावर परस्पर मजुरी उचलल्याचेही स्पष्ट झाले आहे. लेखणीबंद आंदोलन असतानाही ग्रामसेवक बडे यांनी मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याचे उघड झाल्याने आंदोलन केवळ इतरांसाठी आहे की काय? असा सवाल ग्रामसेवकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जिल्हाध्यक्षांनी लेखणीबंदमध्ये स्वाक्षरी करुन आंदोलनाची ‘मर्यादा’ भंग केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामसेवकांतही नाराजीचा सूर आहे. लेखणीबंदचा जिल्हाध्यक्षांनाच विसर पडण्यामागे काय ‘अर्थ’ दडला आहे, हे आता लपून राहिले नाही. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी चऱ्हाट्यातील रोहयो कामांतील अनियमितेला हात घातल्यावर राज्य माहिती आयोगानेही बडे यांना नोटीस धाडून जोरदार दणका दिला. बडे यांचे निलंबन व फौजदारी कारवाईसाठी ढवळे यांच्यासह गावातील नागरिक आक्रमक आहेत. कारवाईशिवाय माघार नाही, असा इशारा दिल्याने बडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा आहे. (प्रतिनिधी)