जिल्हा नियोजन समितीचा ७५ टक्के निधी मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST2021-01-08T04:07:57+5:302021-01-08T04:07:57+5:30

चव्हाण यांनी सांगितले, जिल्हा नियोजन समितीला १३० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीला २४० कोटी ...

District Planning Committee received 75% of the funds | जिल्हा नियोजन समितीचा ७५ टक्के निधी मिळाला

जिल्हा नियोजन समितीचा ७५ टक्के निधी मिळाला

चव्हाण यांनी सांगितले, जिल्हा नियोजन समितीला १३० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीला २४० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. साधारणपणे ७५ टक्के निधी आजवर मिळाला आहे. उर्वरित २५ टक्के निधी येत्या काही दिवसांत मिळणार आहे.

नायलॉन दोरानिर्मिती, विक्री, वापरावर बंदी

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून १ ते १५ जानेवारीपर्यंत पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नायलॉन दोरानिर्मिती, विक्री व वापरावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बंदी घातल्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने, तसेच वन्य पशू-पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून फौजदारी संहितेनुसार आदेश काढले आहेत.

जनार्दन स्वामी पुण्यतिथीनिमित्त यात्रा रद्द

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दौलताबाद किल्ला येथे ९ जानेवारी रोजी श्री संत जनार्दन स्वामी पुण्यतिथीनिमित्त गर्दी करून यात्रा भरविण्यात येऊ नये. भाविक सामाजिक अंतरासह दर्शन करू शकतील, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्राद्वारे त्यांना कळविले आहे.

Web Title: District Planning Committee received 75% of the funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.