शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. : सभापती निवडीत आघाडी टिकली

By admin | Updated: October 2, 2014 00:50 IST

औरंगाबाद : राज्यातील आघाडी तुटली असली तरी जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आघाडी टिकविण्यात आज यश मिळविले.

औरंगाबाद : राज्यातील आघाडी तुटली असली तरी जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आघाडी टिकविण्यात आज यश मिळविले. बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही सभापती आघाडीचे विजयी झाले. त्यात काँग्रेसचे विनोद तांबे, राष्ट्रवादीच्या सरला मनगटे व मनसेचे संतोष जाधव आणि शीला चव्हाण यांचा समावेश आहे. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची विशेष सभा दुपारी ३ वाजता सुरू झाली. समाजकल्याण, महिला व बालकल्याण व त्यानंतर इतर विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आली. समाजकल्याण सभापतीपदासाठी तिघांनी अर्ज भरले होते. त्यापैकी रामनाथ चोरमले यांनी अर्ज परत घेतला. मनसेच्या शीला विजय चव्हाण आणि शिवसेनेच्या योगिता रमेश बहुले यांच्यात लढत झाली. त्यात शीला चव्हाण यांना ३४ तर बहुले यांना २५ मते पडली. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शिवसेनेच्या सुरेखा जाधव यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरला मनगटे व भाजपाच्या डॉ. पल्लवी तुपे यांच्यात लढत होऊन ३३ मते घेऊन सरला मनगटे विजयी झाल्या. डॉ. तुपे यांना २६ मते पडली. इतर दोन सभापतीपदासाठी काँग्रेसचे विनोद तांबे यांनी ३३ व मनसेचे संतोष जाधव यांनी ३५ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी शैलेश क्षीरसागर यांना शून्य व हरिकिशन सुलताने यांना २६ मते पडली. एकूण ८ सदस्यांनी अर्ज भरले होते. परंतु दीपाली काळे, संतोष माने पाटील, मनाजी मिसाळ व सुदाम मोकासे यांनी अर्ज मागे घेतल्याने उपरोक्त चौघात लढत झाली.