जि. प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची वानवा
By Admin | Updated: July 19, 2014 00:44 IST2014-07-18T23:48:41+5:302014-07-19T00:44:01+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे.
जि. प. हायस्कूलमध्ये शिक्षकांची वानवा
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जि.प.शाळेत ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे ज्ञानार्जानावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर लिपिकाची कामेही शिक्षकांनाच करावी लागत आहेत.
बऱ्याच वर्षांपासून रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. क्रीडाशिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना खेळ असतात की नाही असा प्रश्न पडला आहे.
शाळेत एकूण ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी अवघे २५ पदे भरलेली आहेत. पैकी १२ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यात रिक्तपदांपैकी उप मुख्याध्यापक १, पर्यवेक्षक १, माध्यमिक शिक्षक कला ४ पदे प्राथमिक शिक्षक २ पदे विशेष शिक्षक कला १ पद, क्रीडा शिक्षक २ पदे, कनिष्ठ सहाय्यक १ पद मिळून १२ पदांचा कारभार इतर शिक्षकांना सांभाळावा लागत आहे.
परिणामी शिक्षकांसमोर अनेक अडचणी आहेत. रिक्तपदांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
त्यातच १२ रिक्त जागांमुळे लिपिकाचे काम शिक्षकांवर अवलंबून आहे. पगारी बिले व टपाली कामात पूर्ण दिवस जातो. सर्व कार्यालयीन कामे शिक्षकांवर आहे. विशेष म्हणजे सध्या कार्यरत २५ कर्मचारी आहेत. १५ ते १६ कर्मचारी बुलडाणा येथून अप- डाऊन करतात नियमानुसार मुख्यालयी न थांबता दररोज परगावाहून ये- जा करीत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत असल्याचा आरोप पालकांतून होत आहे. (वार्ताहर)
जागा भरण्याची मागणी
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकिरा आहेर यांनी सांगितले, रिक्त जागेचा तपशील नेहमी वरिष्ठांना कळविण्या येतो. ते केवळ आश्वासन देतात परंतु कधीच जागा भरल्या जात नाही. बऱ्याच वेळेस शाळेस कुलूप ठोकले. लेखी आश्वासने दिलीत, परंतु शिक्षक मात्र मिळाले नाहीत.
मुख्याध्यापक चिंचोले म्हणाले, शाळेत पदभार स्वीकारल्यापासून गुणवत्ता सुधारली परंतु रिक्त जागा ही नेहमी डोकेदुखी ठरत आहे. लिपिकाचे कामे नाईलाजाने शिक्षकांवर करण्याची पाळी येते. क्रीडाशिक्षक व लिपिकाची पदे शाळेला महत्वाचे आहे. मात्र ही पदे न भरल्याने शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी होईल. सर्व पदे शासनाने भरावीत.
पालक सांडू ठोकणे म्हणाले, आमची मुल या ठिकाणी शिकतात. येथे सेमी इंग्रजी वर्ग असली तरी येथील तासीका होत नाही. विज्ञानच्या शिक्षकांना कारकुनाचे कामे करावे लागते. नियमित तासिका घेऊन शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. रिक्त पदे भरण्याबाबत तत्परता दाखवावी अशी अपेक्षा होत आहे.