शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीनेही ठेवला ठपका

By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले

बीड : जिल्हा परिषदेतील बेकायदेशीर कामांच्या तक्रारीनंतर सुरु असलेले लेखापरीक्षण पूर्ण होतही नाही, तोच तत्कालीन (कॅफो) मुख्य वित्त व लेखा अधिकारी वसंत जाधवर यांचे ‘डबलबिल’ प्रकरण बाहेर आले. मंगळवारी रात्री जाधवर यांच्यासह मजूर संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.चिंचोली माळी (ता. केज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे दुबार बिल काढून जिल्हा परिषदेची दोन लाख ८६ हजार ६६० रुपयांची फसवणूक करुन अपहार केल्याची फिर्याद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे यांनी दिली. त्यावरुन तत्कालीन कॅफो जाधवर व अध्यक्ष संत ज्ञानेश्वर मजूर सहकारी संस्था, कासारी बोडखा ता. धारुर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. या फिर्यादीने जि.प. च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. ३ आॅक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१४ या दरम्यान तत्कालीन कॅफो वसंत जाधवर यांनी चिंचोलीमाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीचे दोन देयके आदा केली होती. हे धक्कादायक प्रकरण बाहेर आल्यानंतर सीईओ नामदेव ननावरे यांनी कॅफो जाधवर यांच्यासह संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ज्या दिवशी जाधवरांना कार्यमुक्त केले, त्याच दिवशी त्यांनी बनावट देयक अदा केले. सहायक निरीक्षक मारूती शेळके म्हणाले, कागदपत्रे हस्तगत करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)जाधवर यांचे कारनामे...नंदूरबार येथून दोन वर्षांपूर्वी बीडला बदलीने आलेले कॅफो वसंत जाधवर यांचा कार्यकाळ वादग्रस्त होता. नंदूरबारमधील कार‘किर्र्दी’मध्ये केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरुच होता. बीडमध्येही पदाधिकारी- कर्मचाऱ्यांशी त्यांचे नेहमी खटके उडत. सतत ‘कायद्या’ची भाषा बोलणारे जाधवर फायद्याच्या नादातच कचाट्यात सापडले. २९ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांच्यावर एकतर्फी कार्यमुक्तीची नामुष्की ओढावली होती. आता ते पोलिसी चौकशीच्या फेऱ्यात आडकले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत तत्कालीन कॅफो जाधवर यांच्यावर ठपका आहे. वित्त आयोग, झेडपीआर, दलित वस्ती विकास योजनेच्या कामांमध्ये तरतूदीपेक्षा अधिक रुपयांची देयके मंजूर करणे, वित्तीय अनियमितता करणे, रेकॉर्ड न ठेवणे असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.