आरक्षणासाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: February 13, 2015 00:47 IST2015-02-13T00:36:56+5:302015-02-13T00:47:12+5:30
उस्मानाबाद : अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा व मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाजाच्या

आरक्षणासाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा
उस्मानाबाद : अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा व मातंग समाजाला ८ टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाजाच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच मातंग समाजाला ८ टक्के आरक्षणाची मागणीही अनेक वर्षांपासून होत आहे. असे असतानाही आजपावेतो या समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळेच या समाजाचा आर्थिकस्तर उंचावत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या दोन्ही मागण्यांसाठी गुरूवारी येथील साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, बाबासाहेब गोपले, कुसुमताई गोपले, कानिफनाथ देवकुळे, सतीश कसबे, कैलास पवार, गोवर्धन शिंदे, खंडू झोंबाडे, प्रभाकर लोंढे, संजय सरवदे, नवनाथ उपळेकर आदी समाजबांधव सहभागी झाले होते. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.