जिल्हा बॅंक देणार व्यावसायिकांना कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:16+5:302021-06-29T04:05:16+5:30

औरंगाबाद : एमएससी बॅंकेकडून कमी व्याजदराचे चारशे कोटींचे कर्ज घेऊन, त्यातून व्यावसायिकांना मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्याचा ...

District Bank will provide loans to professionals | जिल्हा बॅंक देणार व्यावसायिकांना कर्ज

जिल्हा बॅंक देणार व्यावसायिकांना कर्ज

औरंगाबाद : एमएससी बॅंकेकडून कमी व्याजदराचे चारशे कोटींचे कर्ज घेऊन, त्यातून व्यावसायिकांना मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्याचा निर्णय सोमवारी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

दुपारी एक वाजेनंतर बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक चालली. ती तब्बल चार तास चालली. रोहयो मंत्री संदीपान घुमारे, आ.सतीश चव्हाण, देवयाणी डोणगावकर आदी संचालक वगळता बाकीच्या सदस्यांची उपस्थिती होती. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बैठकीस पूर्ण वेळ उपस्थित होते.

एकूण तीस विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कर्जवसुलीवर बराच वेळ चर्चा झाली. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये कर्जवसुली समाधानकारक नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. अन्य तालुक्यांमध्ये कर्जवसुली फार चांगली नसली, तरी समाधानकारक आहे.

व्यावसायिक कर्जवाटपाच्या संदर्भात अन्य बॅंकांच्या कर्जवाटपाचा अभ्यास करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सोसायट्यांच्या मार्फत पीक कर्जवाटप व सभासदांना थेट कर्जवाटप करण्याचेही ठरले. व्यापाऱ्यांसाठी कॅश क्रेडिट करण्याचा विषयही जिल्हा बॅंकेच्या विचाराधीन आहे.

उपाध्यक्ष अर्जुन गाढे पाटील, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, बॅंकेचे कार्यकारी संचालक आर.आर. शिंदे, संचालक किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, जावेद पटेल, दिनेश परदेशी, अभिषेक जैस्वाल, पार्वताबाई जाधव, डॉ.बळीराम जाधव, डॉ.गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Web Title: District Bank will provide loans to professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.