प्रयागअक्का कराड राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
By Admin | Updated: May 24, 2017 00:32 IST2017-05-24T00:30:07+5:302017-05-24T00:32:28+5:30
लातूर : विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंगळवारी रामेश्वर रूई येथे झाले.

प्रयागअक्का कराड राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंगळवारी रामेश्वर रूई येथे झाले. ज्येष्ठ लेखिका डॉ. माधवी वैद्य (पुणे), शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ. ज्योस्का बंडर्स (द नेदरलँड), डॉ. मेहेर मास्टरमूस (मुंबई), डॉ. ज्योत्स्ना कुकडे (लातूर), प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी (पंढरपूर जि. सोलापूर), समाजसेविका कौशल्याताई ढाकणे (पाथर्डी, जि. अहमदनगर) आदींचा सन्मानपत्र, स्मृतिपत्र, सुवर्णपदक व रोख ११ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.
मंचावर माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा. राहुल कराड, रमेश कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जय गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी गोरे म्हणाले, आज स्त्रिया सर्वच पातळीवर स्वत:ला सिद्घ करत आहेत. त्यांना मिळालेल्या (संबंधित वृत्त हॅलो/२ वर)