उद्योगनगरीत शिंपी समाजातील लाभार्थींना शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST2021-06-20T04:05:11+5:302021-06-20T04:05:11+5:30

येथील श्री इंडस्ट्रिज या कंपनीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागूल तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त डी. व्ही. ...

Distribution of sewing machines to the beneficiaries of the tailor community in the industrial city | उद्योगनगरीत शिंपी समाजातील लाभार्थींना शिलाई मशीन वाटप

उद्योगनगरीत शिंपी समाजातील लाभार्थींना शिलाई मशीन वाटप

येथील श्री इंडस्ट्रिज या कंपनीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागूल तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त डी. व्ही. बिरारी, आर. के. सोनवणे, डी. एम. जगताप, उद्योजक संतोष सोनवणी, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंपी, सुनील गांगुर्डे आदींची उपस्थिती होती. संत नामदेव महाराज यांच्या प्रमितेचे पूजन करून कार्यक्रमला सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंपी यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या स्थापनेला ६१ वर्षे झाल्याचे औचित्य साधून शिवणकामाचा व्यवसाय करणाऱ्या समाजातील गरीब ६१ लाभार्थींनी ६१ शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात शिलाईकाम करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या जनार्दन सोनवणे, रेखा भंडारकर, चंद्रकांत सोनवणे, शकुंतला देवरे, देवकाबाई सन्नासे यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. समाजातील अ‍ॅड. रवींद्र भामरे यांची उच्च न्यायालयात विधिज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. संजय खैरनार यांनी प्रास्ताविक तर प्रशांत शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील शिंपी यांनी आभार मानले.

फोटो ओळ- वाळूज एमआयडीसीत शिंपी समाज औरंगाबाद शाखेतर्फे समाजातील गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करताना रवींद्र बागूल, डी. बी. बिरारी, संतोष सोनवणी, आर. के. सोनवणे, डी. एम. जगताप, सुधाकर शिंपी आदी.

-----------------------

Web Title: Distribution of sewing machines to the beneficiaries of the tailor community in the industrial city