शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

'समाजकल्याण'मध्ये तोडफोड

By admin | Updated: December 31, 2015 13:50 IST

जिल्हा परिषदेच्या समाकल्याण कार्यालयात एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह तोडफोड केली.

 बीड : जिल्हा परिषदेच्या समाकल्याण कार्यालयात एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह तोडफोड केली. बुधवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर कामकाज विस्कळीत झाले; परंतु कर्मचार्‍यांनी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही.महिन्यापूर्वीच समाजकल्याण कार्यालय सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत स्थलांतरीत झालेले आहे. बुधवारी दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयात एकच कर्मचारी बसलेला होता. इतर कर्मचारी जेवणासाठी बाहेर गेलेले होते. यावेळी एक तरुण अन्य दोघांसमवेत तेथे दाखल झाला. त्याने माझे काम का करत नाही? असे म्हणत टेबलवरील काचेची तोडफोड केली. फाईलची फेकाफेक करुन संगणक, खुच्र्या, टेबल व बॅटर्‍यांचीही नासधूस केली. त्यानंतर ते तिघेही तेथून निघून गेले.भयभीत झालेल्या कर्मचार्‍याने धावत खाली येऊन सुरक्षारक्षकाची मदत घेतली. दरम्यान, या घटनेनंतर कार्यालय तासभर बंद ठेवण्यात आले. कर्मचार्‍यांमध्ये सायंकाळपर्यंत दहशतीचे वातावरण होते. हल्ल्यामागचे कारण?हल्ला करणार्‍या तरुणाने दीड वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेला आहे. त्याने आंतरजातीय विवाहांना समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणार्‍या प्रोत्साहन अनुदानासाठी समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला.रितसर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तो सहा महिन्यांपासून खेटे मारत होता; परंतु त्याला काही अनुदान मंजूर झाले नाही. त्यामुळे त्याने थेट हल्ला चढविल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. 

जि.प. समाजकल्याण अधिकारी जयश्री सोनकवडे यांची पदोन्नतीवर ठाणे येथे बदली झाली आहे. प्रभारी कार्यभार मंगळवारपर्यंत विठ्ठल नागरगोजेंकडे होता. कार्यमुक्त होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोनकवडे बुधवारी तात्पुरत्या रूजू झाल्या. त्यामुळे कार्यालयात तोडफोड होऊनही कोणी गांभीर्याने घेतले नाही. शिवाय अनुदान वाटपास समाजकल्याण कार्यालयानेच विलंब केला. त्यामुळे पोलिसांत फिर्याद देण्यासही कोणी पुढे आले नाही.
(प्रतिनिधी)