छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, इस्रायल, इराण व अन्य देशांत भडकलेल्या युद्धाचा वणवा पेटला असून त्याच्या झळा एमआयडीसीतील उद्योगांना देखील बसू लागल्या आहेत. आखाती देशांतून पेट्रोलियम पदार्थांची होणारी आयात युद्धामुळे बंद आहे. परिणामी, औद्योगिक वसाहतींमधील ४०० हून अधिक उद्योग बंद पडण्याचे संकट असून २ लाख रोजगारांना फटका बसण्याची भीती आहे.
५ मार्चपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद आहे. उद्योगांकडे जेवढा साठा आहे, त्यावर त्यांचे उत्पादन सुरू आहे. साठा संपल्यानंतर उद्योगांना बंद करण्याशिवाय पर्याय नसेल. ऑटोमोबाइल्स, ब्रीव्हरेज, बॉटलिंग, फार्मा या उद्योगांवर गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उद्योगांनी वस्तुस्थिती राज्य व केंद्र शासनासह गॅसपुरवठा करणाऱ्या कंपन्यांसमोर मांडली आहे. काही तरी मार्ग निघेल, अशी उद्योग वर्तुळाला अपेक्षा आहे.
बॉयलर बंद झाल्यास ६०० कोटींचा फटकाशहरालगतच्या सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये ४०० कंपन्यांचे बॉयलर्स गॅसवर आहेत. त्यापैकी कॅनपॅक इंडिया लि. या उद्योगाची रोजची १२ मे. टन गॅसची गरज आहे. ४ दिवस पुरेल एवढा गॅस त्या कंपनीकडे आहे. कंपनीत ग्लास बॉटल्स व ॲल्युमिनिअम कॅनचे उत्पादन होते. बॉयलर बंद करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. कंपनीत १ हजार कर्मचारी आहेत. बॉयलर बंद झाल्यास ६०० कोटींच्या आसपास फटका बसेल. फार्मा, बीअर व मद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसह इतर कंपन्यांना याचा फटका बसेल.- विक्रम पोतदार, सीईओ, कॅन पॅक इंडिया लि.
४०० उद्योगांना रोज लागतो ७२ टन गॅस५ मार्चपासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद आहे. उद्योगांचा व्यावसायिक गॅस बंद आहे. ३०० ते ४०० कंपन्यांचे बॉयलर गॅसवर आहेत. कन्व्हर्शन करणे शक्य नाही. बंद केल्यास मोठा तोटा आहे. ७२ मे. टन गॅस उद्योगांना रोज लागतो आहे. कंपन्या व रोजगारावर परिणाम होेऊ शकतो. रिफायनरीमधून व्यावसायिक गॅसनिर्मिती बंद आहे. ३ कंपन्यांचे प्रमुख उद्योगांचा आढावा घेतील. रुग्णालय व काही संस्थांना व्यावसायिक गॅस देता येईल. हॉटेल आणि उद्योगांचा गॅस बंद होईल. पंचतारांकित हॉटेल या आठवड्यापर्यंत स्टॉक आहे. पुढच्या आठवड्यात त्यांचे किचन बंद होतील. पुढच्या आठवड्यात शहरातील सर्व मोठ्या हॉटेल्सचे किचन बंद होतील.-प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी
Web Summary : Aurangabad's industries face closure due to halted gas imports amid global conflicts. 400 businesses risk shutdown, potentially impacting 200,000 jobs. Gas shortages severely affect automobile, beverage, and pharmaceutical sectors. Authorities are seeking solutions to avert the crisis.
Web Summary : वैश्विक संघर्षों के बीच गैस आयात बाधित होने से औरंगाबाद के उद्योगों पर संकट। 400 व्यवसायों के बंद होने का खतरा, जिससे 200,000 नौकरियाँ प्रभावित हो सकती हैं। गैस की कमी से ऑटोमोबाइल, पेय और फार्मास्युटिकल क्षेत्र गंभीर रूप से प्रभावित। अधिकारी संकट को टालने के लिए समाधान खोज रहे हैं।