शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Video: ५० रुपयांच्या पेट्रोलवरुन वाद;१० ते १५ जणांनी केली पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:07 IST

सेव्हनहिलच्या पेट्रोल पंपावर राडा झाल्याचे कळताच आलेल्या पोलिसांनी मारहाण झालेल्यानांच दमदाटी केली

औरंगाबाद : सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या जवळच्या जागृत पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तुफान राडा झाला. ५० रुपयाचे पेट्रोल भरण्यावरुन दुचाकी चालकाने गल्लीतील १० ते १५ जणांना बोलावुन घेत पंपावरील कर्मचारी, व्यवस्थापकासह त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोदंवला आहे.

पंपावरील कर्मचाऱ्यासह त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण करुन निघून गेलेल्या टवाळखोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मारहाण झालेल्यांनाच दमदाटी केल्याचा प्रकारही घडला. पंपाचे व्यवस्थापक शेख हबीबुद्दीन शेख हमीतुद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा एक कर्मचारी गाड्यांमध्ये पेट्रोल टाकत होता. तेव्हा एकजण दोन लहान मुलांसह पेट्रोल टाकण्यासाठी आला. त्याने दुचाकीत (एमएच २० डीझेड ३६६०) ५० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने पेट्रोल टाकल्यानंतर चालकाने पेट्रोल कमी टाकल्यावरुन वाद सुरु केला. तेव्हा दुचाकीस्वाराने पाच मिनिटात चार-पाच लोकांना बोलावून घेत पंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्याने ही माहिती भावाला फोनवरुन सांगितली. तेव्हा कर्मचाऱ्याचा भाऊ, आई-वडिल पंपावर आले. यानंतर काही वेळातच १० ते १५ जणांचा जमाव लाठ्या,काठ्यासह हातात चाकू घेऊन पंपावर आला. त्यांनी कर्मचाऱ्यास पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडविण्यासाठी त्याचे भाऊ, आई-वडिल आतमध्ये पडले. त्यांनाही बेदम मारले. पंपाच्या व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांनाही टोळक्याने बेदम मारहाण करुन निघून गेले. 

बातमीदारी करणाऱ्या २ पत्रकारांनाच पोलिसांनी नेलेतेवढ्यात पुंडलिकनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. मारहाण करणारे त्यांच्या समोरुनच निघुन गेले. त्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्यांनाच दमदाटी केली. तसेच वार्तांकनासाठी घटनास्थळी आलेल्या दोन रिपोर्टरला पोलिसांच्या गाडीत टाकून ठाण्यात नेले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी मारहाण झालेल्यांना बोलावून घेत दहा ते पंधरा आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPetrol Pumpपेट्रोल पंपAurangabadऔरंगाबाद