विस्कळीत पाणीपुरवठ्याचा तेरावा

By Admin | Updated: December 31, 2014 01:05 IST2014-12-31T00:11:30+5:302014-12-31T01:05:57+5:30

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा आज तेराव्या दिवशीही विस्कळीत होता. कंपनीचे नियोजन कोलमडल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले.

Disposal of supply of water | विस्कळीत पाणीपुरवठ्याचा तेरावा

विस्कळीत पाणीपुरवठ्याचा तेरावा

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा आज तेराव्या दिवशीही विस्कळीत होता. कंपनीचे नियोजन कोलमडल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले. त्यातच फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील बिघाड आणि महावितरणकडून दोन दिवस खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली आहे. मंगळवारी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याची बोंब होती, तर गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात धावपळ करावी लागत आहे. २२ रोजी रात्री फारोळा येथील डिलिव्हरी लाईनला भगदाड पडल्यामुळे दोन दिवस सिडको-हडकोसह सर्व शहरात पाण्याची बोंब झाली आहे. त्यानंतर आठवडाभर महागड्या टँकर्सचे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागले.
साधारणत: २५० रुपयांना २ हजार लिटर टँकरचा दर आहे. ते टँकर १२ दिवसांपासून ३०० रुपयांपेक्षा जास्त भावाने विक्री होत आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने टँकर न पाठविल्याने गुंठेवारी व सिडको-हडकोमध्ये खाजगी टँकरचे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागले. फारोळा येथील जलवाहिनीच्या डिलिव्हरी व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी १ दिवस लागला. गेल्या गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. त्यानंतर रविवारी फारोळ्यातील पंप बिघडला.
दरम्यान, आयुक्तांनीही कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पाणीपट्टीची बिले कंपनीलाच वसूल करावी लागतील. रेकॉर्ड कंपनीकडे देताना थोड्या चुका झाल्या.
प्रशासनाने रेकॉर्ड रिकन्सेलशन करून देणे गरजेचे होते. आता
कंपनीने संगणकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे योग्य बिले दिली जातील.

Web Title: Disposal of supply of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.