अन्नसुरक्षा योजनेपासून ग्रामस्थ वंचित
By Admin | Updated: July 29, 2014 01:10 IST2014-07-29T00:02:05+5:302014-07-29T01:10:24+5:30
संजीव पाटील, सुरंगळी भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील अनेक अल्प भूधारक शेतकरी व मध्यम वर्ग कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याने अनेक कुटुंबे शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अन्नसुरक्षा योजनेपासून ग्रामस्थ वंचित
संजीव पाटील, सुरंगळी
भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील अनेक अल्प भूधारक शेतकरी व मध्यम वर्ग कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याने अनेक कुटुंबे शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
अन्नसुरक्षेसाठी नव्याने सर्व्हे करण्यात आला होता. परंतु अनेक गरीब कुटुंबांंना या सर्व्हेतून वगळण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्याकडे चांगली शेती आहे, त्यांचे नावही या यादीत आहे हे विशेष. परंतु रेशन दुकानदाराच्या मर्जीतल्या नागरिकांची नावे आहेत. परंतु जी कुटुंबे अल्पभूधारक, जमीन नसलेली; अशा नागरिकांच्या नावाने कार्ड नसल्याने गरीब कुटुंबांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. सर्व अल्पभूधारक, भूमिहिनांना शिधात्रिका वाटप करण्यात याव्यात असे शासनाचे आदेश असून देखील पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सुरंगळी परिसरातील अनेक कुटुंबांवर आली आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ गरीब कुटुंबाला शिधापत्रिका वाटप करण्यात याव्यात असे आदेश देऊनही पुरवठा विभागाने काहीही कारवाई केलेली नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या परंतु भोकरदन तालुक्यात अद्यापही पुरवठा विभागाने दुजाभाव करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही अशा गरजू कुटुंबांना तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात अशी मागणी ग्रमस्थानी केली आहे.
सध्या तालुक्यात शिधापत्रिका उपलब्ध नसल्याचे भोकरदन तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शेळके यांनी सांगितले.
लोकसंख्येनुसार रॉकेलचा कोटा द्यावा
सुरंगळी येथील चार ते पाच हजार लोकवस्ती आहेत त्यामध्ये अल्पभूधारक भूमिहीन, अंत्योदय, बीपीएल असे बरेच रेशनकार्ड धारक नागरिक आहेत. परंतु बऱ्याच गरीब कुटुंबाकडे रेशन कार्डच नाही त्यामुळे त्यांच्या हिश्श्याचे रॉकेल रेशन दुकानदार उचलून चढ्या भावाने विकत आहे . सुरंगळीला दर महिन्याला अठराशे लिटर रॉकेलचा पुरवठा होतो. प्रत्येक कार्डधारकाला ३ लिटर याप्रमाणे रॉकेल मिळत आहे. लोकसंख्येच्या मानाने परिसराला मिळणारा रॉकेलचा कोटा अत्यंत कमी असून हा कोटा यामध्ये वाढ करण्याची मागणी ग्रामस्थांनी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शेळके यांना केली आहे.
दक्षता कमिटीकडून मागणी
सुरंगळी परिसरातील गरीब कुटुंबाला अन्नसुरक्षा योजनेचा फायदा व्हावा यासाठी इतर तालुक्याला जशा शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या तशा भोकरदन तालुक्याला शिधापत्रिका देण्यात याव्यात अशी मागणी दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.यासाठी सर्वानी पुरवठा विभागाचे तहसीलदार यांनी निवेदन देणार असल्याचे दांडगे यांनी माहिती दिली. सुरंगळीचे माजी सरपंच आणि दक्षता समितीचे सदस्य काशीनाथ दांडगे, शेख एजाज अब्बास आदीनी केली आहे.
रेशनकार्डच नसल्याने अनेक कुटुंबे रॉकेलपासून वंचित
पावसाळ्यात रॉकेलची मागणी वाढली असून परिसरातील रेशन दुकानावर रॉकेल उपलब्ध असले तरी बऱ्याच नागरिकांकडे शिधापत्रिका नसल्याने अनेक कुटुंबाला रॉकेल मिळत नाही, त्यांच्या हिश्श्यांचे रॉकेल रेशन दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असल्याचे चित्र परिसरात आहे. यामुळे रेशन दुकानदारांची चांदी होत आहे. येथील शेख इलियास,शेख जुमान इलियास या कुटुंबाकडे रेशन कार्डच नसल्याने त्यांना रॉकेल मिळत नाही. गॅस महाग असल्याने कसेबसे आम्ही रॉकेल मिळवून आमचा उदरनिर्वाह करत असल्याचे शेख कुटुंबियांनी सांगितले. परिसरात अशी बरीच कुटुंबे आहेत ज्याच्यापाशी रेशनकार्ड नसल्यामुळे रॉकेलपासून वंचित आहेत. पावसाळ्यात इंधन मिळत नसल्याने नागरिक रॉकेलचा उपयोग करतात. परंतु रॉकेलचा सर्रास काळाबाजार परिसरात होत असल्याने यावर प्रशासनाने अंकुश आणावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अनेक वेळा तहसीलदारांकडे तक्रार करून देखील काहीच उपयोग न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.